3D Printing Technology : काही तासांतच उभारला जातो पुतळा आणि घरे, काय आहे 3D प्रिंटिंग टेक्नॉलॉजी?

Shivaji Maharaj statue sindhudurga bulit in 3D Printing Technology: 3D प्रिंटिंग तंत्रज्ञान हे आधुनिक तंत्रज्ञानातील एक महत्त्वाचे पाऊल ठरले आहे.या तंत्रज्ञानाचा वापर उत्पादन आणि डिझाइनिंग क्षेत्रात केला जातो.
3D Printing Technology Revolution in Home Building
3D Printing Technology Revolution in Home Buildingesakal
Updated on

3D Printing Technology : आपण कल्पना करू शकता का, एक पूर्ण घर अवघ्या काही तासांत बांधून होऊ शकते? तर हो. हे आता शक्य झाले आहे. 3D प्रिंटिंग या नवीन तंत्रज्ञानाने बांधकाम क्षेत्रात क्रांती घडवून आणली आहे. 3D प्रिंटिंग तंत्रज्ञान हे आधुनिक तंत्रज्ञानातील एक महत्त्वाचे पाऊल ठरले आहे, ज्याच्या मदतीने केवळ काही तासांत घर बांधणे शक्य झाले आहे.

या तंत्रज्ञानाचा वापर उत्पादन आणि डिझाइनिंग क्षेत्रात केला जातो, ज्यामुळे त्रिमितीय वस्तू तयार करणे आता अधिक सोपे झाले आहे. विशेष प्रकारच्या 3D प्रिंटरच्या मदतीने हे तंत्रज्ञान कार्यरत होते, ज्यामध्ये डिजिटल पद्धतीने तयार केलेल्या त्रिमितीय वस्तूंचे फिजिकल रूपांतर केले जाते.

फक्त घरेच नाही तर पुतळे उभारणीसाठी देखील याच टेक्नॉलॉजीचा वापर केला जात आहे. नुकताच सिंधुदुर्ग येथे कोसळलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जयदीप आपटे यांनी हे काम अवघ्या सहा महिन्यांत पूर्ण केले. हे काम करण्यासाठी त्यांनी ३ डायमेन्शनल प्रिंटिंगच्या तंत्राचा वापर केला होता.

3D प्रिंटिंग तंत्रज्ञान काय आहे?

3D प्रिंटिंग ही एक अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये डिजिटल मॉडेलला प्रत्यक्ष वस्तूमध्ये रूपांतरित केले जाते. यासाठी एक विशेष प्रकारचा प्रिंटर वापरला जातो जो स्तरवार साहित्य जोडून त्रिमितीय वस्तू तयार करतो. या तंत्रज्ञानाचा वापर आता फक्त छोट्या वस्तू बनवण्यापुरता मर्यादित नाही तर मोठ्या बांधकाम प्रकल्पांसाठीही होऊ लागला आहे.

3D Printing Technology Revolution in Home Building
Laptop Tips : तुमच्या स्लो झालेल्या लॅपटॉपला सुपरफास्ट बनवण्याच्या सोप्या ट्रिक्स

घर बांधकामात 3D प्रिंटिंगचे फायदे

वेळेची बचत: 3D प्रिंटिंगच्या मदतीने पारंपरिक पद्धतीपेक्षा खूप कमी वेळात घर बांधता येते.

कमी खर्च: या तंत्रज्ञानात कमी कच्चा माल वापरला जातो, त्यामुळे बांधकामाचा खर्च कमी येतो.

अधिक मजबूतपणा: 3D प्रिंटिंगद्वारे तयार केलेले घर अधिक मजबूत आणि टिकाऊ असते.

नवीन डिझाइनची मुभा: 3D प्रिंटिंगच्या मदतीने कोणत्याही आकाराचे आणि डिझाइनचे घर बांधता येते.

3D Printing Technology Revolution in Home Building
Oneplus Smartphone Sale : खुशखबर! वनप्लसच्या 'या' ब्रँड स्मार्टफोनवर मिळतोय चक्क 11 हजारांचा डिस्काउंट,एकदा बघाच

भारतात 3D प्रिंटिंगला संधी आहे काय?

भारतात अफाट बांधकाम क्षेत्र असल्याने 3D प्रिंटिंग ही एक मोठी संधी आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण स्वस्त आणि जलद गतीने घर बांधून गरीबांना घर उपलब्ध करून देऊ शकतो. सरकारच्या 'मेक इन इंडिया' आणि 'स्मार्ट सिटी' यासारख्या मोहिमांनाही 3D प्रिंटिंग बळ देऊ शकते.

3D प्रिंटिंग तंत्रज्ञानाने घर बांधणीला नव्या उंचीवर नेले आहे, ज्यामुळे केवळ वेळ आणि श्रमांची बचत होत नाही तर निर्माण कार्यातील अचूकतेचीही हमी मिळते. भविष्यात या तंत्रज्ञानाचा अधिक व्यापक वापर होण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.