काय असतं मास्क्ड आधार कार्ड? जाणून घ्या फायदे, डाऊनलोड प्रोसेस

aadhaar card
aadhaar card
Updated on

आजच्या काळात जवळपास प्रत्येकाकडे आधार कार्ड (Aadhaar Card) आहे, कारण ते जवळपास सर्वच ठिकाणी गरजेचे बनले आहे. बँकेत, शाळेत, ऑफिसमध्ये, सिमकार्ड घेताना तुम्हाल आधार कार्डची आवश्यकता पडते. त्यामुळे जवळपास प्रत्येकजण ते सोबत बाळगतात. आधार कार्डमध्ये आपले नाव, जन्मतारीख, वडिलांचे नाव, पत्ता आणि आधार कार्डचा युनीक नंबर असतो. पण तुम्हाला मास्क्ड आधार कार्डबद्दल (Masked Aadhaar Card) माहिती आहे का? कदाचित तुमचे उत्तर नाही असेल.

वास्तविक, मास्क्ड आधार कार्ड तुमच्या आधार क्रमांकाचे सुरुवातीचे आठ क्रमांक हे लपवलेले असतात आणि फक्त शेवटचे चार अंक दिसतात. आजच्या काळात हा एक ट्रेंड आहे, आणि तुम्ही घरी बसल्या बसल्या मिनिटांत तुमच्या मोबाईल फोनवर किंवा कॉम्प्युटरमध्ये ते सहज डाउनलोड करता येईल. तुम्हालाही हे मास्क्ड आधार कार्ड घ्यायचे असेल, तर ते डाउनलोड करण्याचा सोपी प्रोसेस आज आपण पाहणार आहोत.

मास्क्ड आधार कार्डचा फायदा असा होतो की, जरी तुमचे आधार कार्ड हरवले तरी त्याचा गैरवापर केला जाऊ शकत नाही. तुम्ही या आधार कार्डची कॉपी सहज डाऊनलोड करु शकता त्यासाठी eaadhaar.uidai.gov.in/ या वेबसाईटवर लॉगइन करावे लागेल

aadhaar card
लवकरच येतेय BMW ची इलेक्ट्रिक कार; सिंगल चार्जमध्ये धावेल 425 किमी

मास्क केलेले आधार कार्ड कसे डाउनलोड करावे

  • मास्क्ड आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी, तुम्हाला प्रथम UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल आणि येथे देण्यात असलेल्या Download Aadhar च्या ऑप्शनवर क्लिक करावे लागेल.

  • आता तुम्हाला आधार / व्हीआयडी / एनरोलमेंट आयडी या ऑप्शनवर क्लिक करावे लागेल त्यानंतर मास्क्ड आधार कार्ड ऑप्शनवर क्लिक करावे लागेल

  • येथे तुम्हाला तुमची महत्त्वाची माहिती विचारली जाईल, जी तुम्हाला येथे भरावी लागेल, यानंतर, तुम्हाला रिक्वेस्ट ओटीपीसह बटणवर क्लिक करावे लागेल.

  • यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाइल क्रमांकावर एक वन टाईम पासवर्ड म्हणजेच ओटीपी येईल (आधार कार्डशी लिंक केलेला मोबाइल क्रमांक). तो इंटर केल्यानंतर, तुम्हाला डाउनलोड आधार या ऑप्शनवर क्लिक करावे लागेल, ज्यावरून तुमचे मास्क्ड आधार कार्ड डाउनलोड केले होइल

aadhaar card
Online Ration Card : घरबसल्या बनवा रेशन कार्ड; जाणून घ्या प्रोसेस

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()