भारतातील सर्वात मोठी खाजगी टेलिकॉम कंपनी Jio आणि एकमेव सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL अनेक दर्जेदाप प्लॅन ऑफर केले जातात. आज आपण Jio आणि BSNL च्या एका प्लॅनबद्दल जाणून घेत आहोत ज्याची किंमत 250 रुपयांपेक्षा कमी आहे, पण तरीही यामध्ये तुम्हाला महागड्या प्लॅन्स सारख्ये बेनिफिट्स मिळतात.
BSNL चा 247 रुपयांचा प्लॅन
BSNL च्या 247 रिचार्ज प्लॅन कोणत्याही डेली लिमीट शिवाय 50GB हाय-स्पीड डेटा ऑफर करतो, यामध्ये तुम्ही पाहिजे तेव्हा पूर्ण 50GB डेटा वापरू शकता. 50GB नंतर, इंटरनेटस्पीड ही 80Kbps पर्यंत कमी होते. तसेच, हा प्लॅन 30 दिवसांच्या वैधतेसह येतो. याशिवाय, वापरकर्त्यांना देशातील सर्व नेटवर्कवर अमर्यादित व्हॉइस कॉल तसेच मोफत इरॉस नाऊ सबस्क्रिप्शन देखील दिले जात आहे. या प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएस देखील मिळतात.
Jio चा 249 चा प्लॅन
Jioचा 249 चा प्लॅन 23 दिवसांच्या वैधतेसह येईल. या प्लॅनमध्ये दररोज 2GB हाय-स्पीड इंटरनेट डेटा येतो. यासोबतच जिओ आपल्या यूजर्सना अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग सुविधा तसेच, दररोज 100 एसएमएस फ्री उपलब्ध आहेत. या रिचार्जसह तुम्हाला Jio अॅप्स (JioTV, JioCinema ) फ्री एक्सेस मिळतो.
BSNL चा 247 प्लॅन vs Jio चा 249 प्लॅन
बीएसएनएलच्या 247 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये डेटासाठी कोणतीही डेली लिमीट नाही. Jio च्या 249 रिचार्ज प्लॅनमध्ये दुसरीकडे हाय-स्पीड डेटा दर दिवशी 2GB इतकाच मिळतो. एकदा 2GB डेटा संपल्यानंतर, हाय-स्पीड डेटाचा साठी दुसऱ्या दिवसापर्यंत थांबावे लागते.
BSNL च्या 247 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये एकूण 50GB डेटा मिळतो, तर Jio च्या 249 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये एकूण 46GB डेटा मिळतो.
BSNL चा प्लॅन स्वस्त आहे आणि 30 दिवसांची वैधता देतो, तर Jio चा रिचार्ज प्लॅन थोडासा जास्त महाग आहे आणि फक्त 23 दिवसांची वैधता ऑफर करतो.
Jio 249 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये 4G स्पीडचा मिळतो, तर BSNL फक्त 3G आणि 2G स्पीड ऑफर करेल.
जर तुम्ही 3G इंटरनेट स्पीडवर समाधानी असाल, तर BSNL चा 247 चा रिचार्ज प्लान जवळपास सर्व बाबतीत Jio रिचार्ज प्लॅनपेक्षा चांगला आहे. Jio चा 4G स्पीड देखील देशात सगळीकडे उपलब्ध नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.