ट्विटरला पर्याय असलेल्या भारतीय बनावटीच्या Koo वर युजर्सचा डाटा धोक्यात

kolhapur news Users data is compromised on Indian-made Koo
kolhapur news Users data is compromised on Indian-made Koo
Updated on

कोल्हापूर : ट्विटरला पर्याय असलेल्या भारतीय बनावटीच्या Koo या अॅपवरील युजर्सचा डाटा सुरक्षित नसल्याचा दावा एका फ्रेंच सुरक्षा संशोधकाने केला आहे. कू आपल्या युजर्सचा डाटा उघड करत असल्याचा दावा या संशोधकाने केला आहे. रॉबर्ट बैप्टिस्ट असे या व्यक्तीचे नाव आहे. २०२० मध्ये सुरू झालेल्या या अॅपला भाजपच्या काही मंत्र्यांसह अनेक सेलिब्रेटींनीह प्रमोट केले होते. कू ची स्वतंत्र वेबसाईट असून ट्विटरला पर्याय म्हणून कू या अॅपची निर्मिती केली आहे. 

राॅबर्टचा दावा आहे की, मी कोवर अर्धा तास वेळ घालविला. त्यानंतर माझ्या लक्षात आले की माईक्रोब्लाॅगिंग प्लॅटफाॅर्मवर  (Koo)वापरकर्त्याची वैयक्तीक माहिती, जशी की, ईमेल, नाव आणि जन्म तारखेसह इतर माहिती उघड करत आहे. 

राॅबर्टने त्याच्या या संशोधनाबद्दल सविस्तर माहिती दे अनेक ट्विटस केले आहेत. या ट्विटमध्ये तो सांगत आहे की, कू च्या वापरकर्त्याची वैयक्तीक माहिती सुरक्षित नाही. राॅबर्टने स्वतः कू हे अॅप हॅक करून हा दावा केला आहे. 

राॅबर्टने ट्विटरवर काही स्क्रिन शाॅट्स टाकून सांगितले आहे की, कू च्या डोमेलाला चीनमध्ये आणि अमिरिकेतही रजिस्टर केले आहे. या अॅपला केंद्रिय मंत्री पीयूष गोयल, मंत्री रविशंकर प्रसाद यांच्यासह अनेक सरकारी अधिकाऱ्यांनी प्रमोट केले होते. ट्विटरवर एक पोस्ट टाकून कू मध्ये सहभाही होण्याचे आवाहन या मंत्र्यांनी केले होते. 

इंडिया पोस्ट (India Post) आणि MeiTY सह अने मंत्रालय आणि सरकारी कंपन्यांनीही कू वर आपली खाती उघडली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार कू डेस्कटाॅप, iOS आणि AatmaNirbhar Bharat Innovate Challenge जिंकला होता. ज्याचा उद्देश स्थानिक अॅपला प्रोत्साहन देने हा होता. Koo ची निर्मिती अपरमेय राधाकृष्ण यांनी तयार केली आहे. तेच या प्लेटफॉर्मचे सह-संस्थापक आणि सीईओ आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.