Eco-Friendly Paper : विद्यार्थ्यांकडून पर्यावरणपूरक कागद निर्मिती; पालापाचोळ्याचा वापर, पेनाने लिहा अन् प्रिंटही काढा

१२ ते १३ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांनी ही पालापाचोळ्यातून कागद निर्मितीची संकल्पना मांडली; आणि सत्यातही उतरवली.
Eco-Friendly Paper
Eco-Friendly PapereSakal
Updated on

दररोजच्या वापरात कागद अनिवार्यच. त्याच्या निर्मितीसाठी असंख्य झाडे तोडली जातात. परंतु झाडे न तोडता कागद निर्मिती होऊ शकते का? हा विचार डोक्यात आला आणि १२ ते १३ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांनी पालापाचोळ्यातून कागद निर्मितीची संकल्पना मांडली. त्यांनी केवळ संकल्पनाच मांडली नाही, तर पालापाचोळ्यातून पेनाने लिहिता येऊ शकेल असा. अन्‌ एवढंच नव्हे तर आशय प्रिंट करता येईल, असा पर्यावरणपूरक कागद तयार केला.

कोल्हापूरमधील करनूर (ता. कागल) येथील विद्यामंदिर रामकृष्णनगर जिल्हा परिषदेच्या शाळेतील पर्यावरणपूरक सामग्रीचा वापर करून कागद तयार केला. पर्यावरणपूरक कागदाचा प्रकल्प पुण्यात आयोजित केलेल्या ५०व्या राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी सादर केला.

सातवीतील विद्यार्थी नम्रता कांबळे आणि अवधूत कांबळे म्हणाले, ‘‘कागद निर्मितीसाठी झाडे मोठ्या प्रमाणात तोडली जातात. वृक्षतोड होऊ नये, म्हणून आम्ही पालापाचोळ्यातून कागद निर्मिती करण्याचा प्रयोग केला आहे. यामध्ये अगदी गवत, पालापाचोळा, शेतातील तन यापासून कागद निर्मिती शक्य आहे.’’

नम्रता म्हणाली, ‘‘सुरुवातीला आम्ही पुठ्ठ्याप्रमाणे जाड कागदाची निर्मिती केली. आमच्यासमोर पातळ कागद तयार करण्याचे आव्हान होते. मग आम्ही प्रक्रियेतील मिश्रण आणखी पातळ केले. लहान छिद्र असणाऱ्या जाळीपासून फ्रेम तयार केली. त्यापासून पातळ कागद तयार केला. त्यावर प्रिंट काढता येते.’’

कागद निर्मितीची प्रक्रिया

  • एका भांड्यात पाणी घेऊन त्यात गवत, पालापाचोळा किंवा शेतातील तन टाकावे

  • मिश्रण चांगले उकळून घ्यावे

  • मिश्रणात कोरफड, भेंडीचे पाणी घाला

  • मिश्रण सुती कापडावर पसरवून वाळवून घ्यावे

कागदासाठी लागणारे साहित्य

  • गवत/पालापाचोळा/शेतातील तन

  • कोरफड

  • भेंडीचे पाणी

फायदे

  • वृक्षतोडी आटोक्यात येणे शक्य

  • सहज विघटनशील कागदनिर्मिती

  • पाण्याचा कमी वापर

  • कमी खर्चात निर्मिती शक्य

  • पर्यावरणाची हानी नाही

  • रसायनविरहित कागद

पर्यावरणपूरक कागद काळाची गरज आहे. कागद कोणत्याही स्वरूपाचा पालापाचोळा, शेतीतील तन, गवत यांच्यापासून केवळ तीन घटकांमधून तयार करता येतो. अशा स्वरूपाचा कागद घरोघरी तयार केला जाऊ शकतो. विद्यार्थ्यांनी तयार केलेला कागद दैनंदिन कामकाजात आणण्याचा आमचा मानस आहे. आपल्या दररोजच्या वापरातील कागदाला पर्यावरणपूरक कागद उत्तम पर्याय ठरू शकतो.

- विद्या आयरे, शिक्षिका, विद्यामंदिर रामकृष्णनगर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.