केटीएमने (KTM 390 Adventure) नुकतेच जागतिक पातळीवर आपली लोकप्रिय आरसी रेंजला अपडेट केले आहे. आता यानंतर कंपनी ३९० अॅडव्हेंचर अपडेट करण्यावर काम करित आहे. ती परदेशात चाचणीच्या दरम्यान दिसली आहे. माहितीनुसार नवीन ३९० अॅडव्हेंचर उपलब्ध माॅडलच्या तुलनेत अधिक फिचर्सने सज्ज बाईक लाँच केली जाणार आहे. नवीन ३९० अॅडव्हेंचर मोटारसायकल उपलब्ध माॅडलच्या पुढील पिढीचा अपडेट अवतार असू शकतो. केटीएम सर्वसाधारणपणे ५-७ वर्षांत आपली कोणतीही मोटारसायकलची (Bike) अपडेट व्हर्जन सादर करते. अशा स्थितीत नेक्स्ट जनरेशन ३९० अॅडव्हेंचरचे अपडेट व्हर्जनचे लाँच करण्याची योग्य वेळ असू शकते. (KTM 390 Adventure New Features)
३९० अॅडव्हेंचरच्या स्पाय छायाचित्रामध्ये दिसते की या माॅडलमध्ये सर्वात मोठ्या अपडेटमध्ये स्पोक व्हिल्सचा समावेश असेल. ती २१ इंच असण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त त्यात नवीन फ्रेमही पाहायला मिळू शकतो. कंपनी बाईकच्या पावरट्रेनमध्ये ही बदल करु शकते. मात्र त्याबाबत दुजोरा मिळालेला नाही. आशा आहे, की ती २०२३ च्या शेवटी किंवा २०२४ च्या सुरुवातीला बाजारात येईल. या व्यतिरिक्त नवीन पिढी आरसी ३९० च्या लाँचची आशा आहे. जी पुढील काही आठवड्यांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.