Lamborghini Urus S : लवकरच लॉन्च होणार नवी लॅम्बोर्गिनी कार; असे आहेत फीचर्स

Lamborghini Urus S
Lamborghini Urus SSakal
Updated on

लक्झरी कार निर्माता कंपनी लॅम्बोर्गिनी इंडीयन मार्केट मध्ये नवी कार लॉन्च करणार आहे. 13 एप्रिल रोजी कार कंपनी लॅम्बोर्गिनी Urus S लाँच करणार आहे. सध्या भारतात Lamborghini Urus Performante मॉडेलची विक्री होते. या कारची किंमत 4.22 कोटी रुपये आहे.

2012 च्या बीजिंग ऑटो शोमध्ये एक सेंसिबल फॅमिली कार म्हणून Urus S लाँच करण्यात आली होती. पुढे 2018 मध्ये ही कार बाजारात विक्रीसाठी काढण्यात आली. 2022 पर्यंत या कारचे 20,000 युनिट्स विकले गेले. या आकडेवारीवरून समजतं उरुस ही लॅम्बोर्गिनीची सर्वाधिक विक्री होणारी कार आहे.

Lamborghini Urus S
एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

Lamborghini Urus S ही परफॉर्मेंटच्या तुलनेत थोडी वेगळी आहे. Urus S ला कूलिंग व्हेंट्ससह सिंगल टोनचे बोनेट मिळते. कंपनीने Lamborghini Urus S च्या पुढील आणि मागील बंपरमध्येही बदल केले आहेत. लक्झरी एसयूव्हीला नवीन डिझाइनसह 21 इंची अलॉय व्हील देण्यात आले आहेत. चाकाची हाईट 23 इंचापर्यंत असू शकते.

Lamborghini Urus S च्या इंजिनबद्दल बोलायचं झाल्यास ही कार 4.0 लीटर ट्विन-टर्बोचार्ज्ड V8 इंजिनच्या पॉवरसह येते. ही कार Performante पेक्षा जड आहे, त्यामुळे तिचा पिकअप वेग थोडा कमी आहे. आतील बाजूस वेगवेगळ्या ट्रिम आणि स्टिचिंगसह ड्युअल टोन इंटीरियर थीम मिळते.

Lamborghini Urus S
Viral Video : "मी अंधश्रद्धा पसरवत नाही"; व्हायरल झालेला चुलीवरचा बाबा म्हणतो...

इंडीयन मार्केटमध्ये लॅम्बोर्गिनीच्या तीन मॉडेल्सची विक्री होते. यात SUV Urus, Huracan Tecnica आणि Aventador या स्पोर्ट्स कारचा समावेश आहे. 29 मार्च रोजी कंपनी Aventador चं पुढचं व्हर्जन सादर करणार आहे. ही एक प्लग-इन सुपरकार असेल जी या वर्षाच्या अखेरीस भारतात लॉन्च केली जाऊ शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()