Agristog App : शिवाराची माहिती सेकंदात मिळणार; भूमी अभिलेख विभागाकडून ‘ॲग्री स्टॉग’ राज्यभरात लागू होणार

Agri-Stog to Provide Instant Farm and Crop Information : भूमी अभिलेख विभागाने तयार केलेल्या ‘ॲग्री स्टॉंग’ ॲपचा वापर राज्यभरात लवकरच सुरू करण्यात येणार आहे.
Maharashtra to Roll Out Agri-Stog App for Agricultural Insights
Agristog App esakal
Updated on

Agristog App Launched in Maharashtra : जिल्हानिहाय आणि गावनिहाय कोणती पिके घेतली जातात, कुठे बियाणे उपलब्ध आहेत, कुठे कमी आहेत, शेतकऱ्यांना किफायतशीर दरात कुठे बियाणे उपलब्ध आहेत, कोणत्या भागातील जमिनींमध्ये नायट्रोजनचे प्रमाण कमी आहे, तर कुठे जास्त आहे, कोणत्या हंगामात कोणत्या भागात कोणती पिके घेतली जातात. या सर्व गोष्टी विचारात घेऊन अनुदानित योजना कशा पद्धतीने राबविल्या पाहिजेत. याची सर्व माहिती आता एकाच ठिकाणी शेतकरी आणि राज्य सरकारला उपलब्ध होणार आहे. तसेच, प्रत्येक शेतकऱ्याला एक ओळख क्रमांक दिला जाणार आहे. त्यासाठी भूमी अभिलेख विभागाने तयार केलेल्या ‘ॲग्री स्टॉंग’ ॲपचा वापर राज्यभरात लवकरच सुरू करण्यात येणार आहे.

महसूल आणि कृषी विभाग यांच्या मदतीने हे ॲप विकसित केले आहे. केंद्र सरकारच्या मदतीने देशातील पाच राज्यात ही योजना लागू केली. त्यामध्ये महाराष्ट्राचा समावेश आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी जमाबंदी आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली होती. त्यामध्ये कृषी आयुक्त, अप्पर जिल्हाधिकारी आणि तांत्रिक सदस्य आहेत. ही समिती कृषी, महसूल विभागातील माहिती संकलित करून एकमेकांना लिंक करण्याचे काम करीत आहे. ई-पीक पाहणी ॲपद्वारे राज्यातील शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती उपलब्ध झाली आहे.

Maharashtra to Roll Out Agri-Stog App for Agricultural Insights
Google Legal Battle : गुगलला मोठा दणका; भरावा लागणार २६ हजार कोटींचा दंड, १५ वर्षांपासून सुरु असलेल्या कोर्ट केसचं प्रकरण काय?

तसेच, कृषी विभागाकडेही शेती आणि शेतकऱ्यांची माहिती उपलब्ध आहे. या दोन्ही विभागांची माहिती एकमेकांशी जोडली जाणार आहे. जमिनींचा मालकापासून ते त्यांचे क्षेत्र, त्यावर घेण्यात येणारी पिके, त्यांना लागणारी बियाणे, माती परिक्षणाचा अहवाल, केंद्र-राज्य सरकारच्या शेतीसंदर्भातील असलेल्या योजना, अनुदान आणि लाभार्थी यांची माहिती या ॲपवर असेल. केंद्र-राज्य सरकारला कोणाच्या योजना कोणत्या भागात राबविल्या पाहिजेत. त्याचा लाभ थेट शेतकऱ्यांना देणेही सोपे होणार आहे. हा सर्व विदा आधार क्रमांकाशी जोडला असल्यामुळे सरकारी अनुदान वाटपातील गैरप्रकारही थांबण्यास मदत होणार आहे.

Maharashtra to Roll Out Agri-Stog App for Agricultural Insights
Mobile Storage Tips : मोबाईलचं स्टोरेज झालंय फुल? महत्वाचा डेटा न गमावता मिनिटात मिळेल फ्री स्पेस,वापरून पाहा 'या' स्मार्ट ट्रिक्स

शेतीची उत्पादकता आणखी वाढणार!

प्रायोगिक तत्त्वावर नाशिक जिल्ह्यातील दिंडोरीतील दहा गावांत हा प्रकल्प राबविण्यात आला. त्याला यश मिळाल्याने आता राज्यस्तरावर ते लागू करण्यास राज्य सरकारने मान्यता देण्यात दिली आहे. त्यासाठी भौगोलिक संदर्भाच्या मदतीने गावाचा नकाशा एकमेकांना जोडण्याचे काम सुरू केले आहे. शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी या ॲपची मदत होईल.

राज्यातील सातबारा उताऱ्यांची संख्या

दोन कोटी ७२ लाख

राज्यातील खातेदारांची संख्या

तीन कोटी २४ लाख

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.