Laptop Import Ban: आता 'या' तारखेपासून लॅपटॉपच्या आयातीवर बंदी होणार लागू , सरकारचा कंपन्यांना दिलासा

Laptop Import Ban: उद्योग मंत्रालयाने शुक्रवारी रात्री जारी केलेल्या अधिसूचनेमध्ये बंदी लागू करण्याची अंतिम मुदत वाढवली.
Laptop Import Ban
Laptop Import Bansakal
Updated on

Laptop Import Ban: लॅपटॉप आणि टॅबलेटच्या आयातीवर बंदी घालण्याचा सरकारचा निर्णय आता 1 नोव्हेंबरपासून लागू होणार आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने शुक्रवारी रात्री जारी केलेल्या अधिसूचनेमध्ये बंदी लागू करण्याची अंतिम मुदत वाढवली.

या अधिसूचनेत असे म्हटले आहे की, आधीच आयात केलेला सर्व माल 31ऑक्टोबरपर्यंत परवान्याशिवाय आयात करता येईल. 1 नोव्हेंबरपासून या वस्तूंच्या आयातीसाठी परवाना अनिवार्य असेल. लॅपटॉप, टॅब्लेट, कॉम्प्युटर, अल्ट्रा-स्मॉल कॉम्प्युटर आणि सर्व्हर या अधिसूचनेच्या कक्षेत येतील.

आयटी उद्योगाने सरकारकडे 3-6 महिन्यांचा वेळ मागितला होता. त्याआधारे सरकारने उद्योगांना सुमारे 3 महिन्यांची मुदत दिली आहे.

भारतात HP, Apple आणि Samsung ची आयात थांबली

केंद्र सरकारच्या या निर्बंधांच्या घोषणेनंतर अॅपल, सॅमसंग आणि एचपी या जगातील तीन मोठ्या कंपन्यांनी त्यांच्या लॅपटॉप आणि टॅबलेटच्या भारतात आयातीवर बंदी घातली आहे.

Laptop Import Ban
Supreme Court: येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांना सुप्रीम कोर्टाचा धक्का, जामीन अर्जावर विचार करण्यास दिला नकार

चंद्रशेखर म्हणाले, आयातीवरील अवलंबित्व कमी करणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे. लॅपटॉप, टॅब्लेट आणि पर्सनल कॉम्प्युटरच्या आयातीसाठी परवान्याची आवश्यकता लागू करण्याच्या भारताच्या निर्णयामुळे देशांतर्गत उत्पादनाला चालना मिळेल, असे चंद्रशेखर म्हणाले.

देशातील सध्याचे नियम कंपन्यांना लॅपटॉप आयात करण्यास परवानगी देतात, परंतु नवीन नियमानुसार या उत्पादनांसाठी विशेष परवाना आवश्यक असेल. आयात बंदीमुळे भारताची चीनसोबतची व्यापारी तूट भरून काढण्यास आणि उत्पादनाला चालना मिळण्यास मदत होईल.

Laptop Import Ban
Zomato Profit: 'अरे त्यासाठी घरोघरी जाऊन'..., झोमॅटोनं यंदा कमावले किती? ट्रोल करणाऱ्या ट्विटनं दिलं उत्तर

लॅपटॉप आणि टॅबलेटची मागणी झपाट्याने वाढेल

भारतात दिवाळी लवकरच येणार आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर कंपन्यांकडून ऑफर्स दिल्या जातील. शाळा किंवा महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही वाढणार आहे.

अशा परिस्थितीत देशात लॅपटॉप आणि टॅब्लेटची मागणी झपाट्याने वाढणार आहे. टेक कंपन्या आता लवकरात लवकर परवाने मिळवण्यासाठी भारत सरकारसोबत काम करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.