Largest Boot Space : आज आपण भारतातील अशा टॉप 5 स्कूटर्सबद्दल जाणून घेऊया ज्या चांगली बूट स्पेस देतात. या स्कूटर्स भारतीय बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध आहेत... रिव्हर इंडी स्कूटरला 43-लिटर अंडरसीट स्टोरेज मिळतं. हे अंडरसीट स्टोरेज भारतीय बाजारात उपलब्ध असलेल्या इतर स्कूटरपेक्षा जास्त आहे. या स्कूटरची स्टार्टिंग प्राईज 1.25 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.
Ola S1, S1 Pro इलेक्ट्रिक स्कूटरना 36 लीटरचा बूट स्पेस मिळतो. Ola S1 ची किंमत 89,999 रुपये आहे, तर S1 Pro ची किंमत 1.30 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. Ola S1 Air मध्ये 34 लीटरची बूट स्पेस देण्यात आली आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 84,999 रुपये आहे. ही किंमत एक्स-शोरूमनुसार आहे.
या लिस्ट मध्ये ज्युपिटर 125 ही एकमेव पेट्रोल-स्कूटर आहे. यात 33-लीटर बूट स्टोरेज मिळते. स्कूटरची किंमत 82,825 पासून सुरू होते. ही किंमत एक्स-शोरूमनुसार आहे. Hero Vida V1 इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 26 लीटर अंडरसीट स्टोरेज देण्यात आलाय. त्याची सुरुवातीची किंमत 1.45 लाख रुपये आहे, जी एक्स-शोरूमनुसार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.