शानदार फीचर्ससह AirFree Pods, AirFree TWS भारतात लॉन्च

तिन्ही इयरफोन्सची उत्तम रचना
omthing
omthingesakal
Updated on

ऑडिओ कंपनी वन मोअरची (1MORE) उप-ब्रँड समजल्या जाणाऱ्या ओमथिंगने (omthing) तीन उत्तम इयरफोन एअरफ्री पॉड्स (AirFree Pods), एअरफ्री टीडब्ल्यूएस (AirFree TWS) आणि एअरफ्री लेस नेकबँड (Airfree Lace Neckband) भारतीय बाजारात लाँच केले आहेत. या तीन इयरफोन्सची उत्तम रचना करण्यात आली असून या तिन्हीला शक्तिशाली डायनॅमिक ड्रायव्हर्स देण्यात आले आहेत. याशिवाय, यूजर्संना तिन्ही लेटेस्ट इयरफोनमध्ये मजबूत बॅटरी सपोर्टही मिळणार आहे. तसेच या तीन इयरफोनना भारतीय बाजारपेठेत आधीच अस्तित्वात असलेल्या पोट्रोनॉईक्स Potronoics, झुक Zook आणि झिओमी Xiaomi या उपकरणांशी कडवी स्पर्धा करावी लागणार आहे.

Summary

या तीन इयरफोनना भारतीय बाजारपेठेत आधीच अस्तित्वात असलेल्या पोट्रोनॉईक्स Potronoics, झुक Zook आणि झिओमी Xiaomi या उपकरणांशी कडवी स्पर्धा करावी लागणार आहे.

जाणून घ्या किंमत

कंपनीने AirFree Pods ची किंमत 3,999 रुपये आणि AirFree TWS ची किंमत 2,499 रुपये ठेवली आहे, तर AirFree Lace Neckband 1,499 रुपयांच्या किंमतीत उपलब्ध आहे. त्याचबरोबर, ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्ट वरून तीनही नवीन इयरफोन खरेदी करता येणार आहेत.

AirFree Pods

एअरफ्री पॉड्सची रचना उत्तम करण्यात आली असून त्याचे इयरबड्स कानात सहजरित्या बसतात. या इयरफोनमध्ये शक्तिशाली बॅटरी देण्यात आली आहे, जी एकाच चार्जमध्ये 25 तासांचा बॅकअप देते. एअरफ्री पॉड्समध्ये टच कंट्रोल आणि 113 mm डायनॅमिक ड्रायव्हरही आहे. याशिवाय, क्वालकॉम सीव्हीसी cVc 8.0 आवाजावर नियंत्रण ठेवणार आहे, तर 4 इन-बिल्ट मायक्रोफोन इयरबड्सला सपोर्ट देईल. याद्वारे, युजर्स कोणत्याही अडचणीशिवाय फोन कॉल करू शकतील.

AirFree TWS

एअरफ्री TWS चे वजन कमी असून त्याचे इयरबड्स वापरकर्त्यांच्या कानाच्या आकारात बनवण्यात आले आहेत. या इयरफोनमध्ये ब्लूटूथ 5.0 सह मजबूत बॅटरी दिली आहे. कंपनीचा दावा असा आहे, की त्याची बॅटरी एकाच चार्जमध्ये 20 तासांचा बॅकअप देते. तसेच उत्कृष्ट आवाजासाठी त्याला 7mm डायनॅमिक ड्रायव्हर दिले गेले आहेत.

omthing
NTPC मध्ये नोकरीची सुवर्ण संधी; महिन्याला मिळणार 71 हजार पगार

Airfree Lace Neckband

एअरफ्री लेस नेकबँड इयरफोनचे वजन कमी असते. या इयरफोनमध्ये गुळगुळीत सिलिकॉन नेकबँड आहे, जो मानेवर कोणताही भार आणत नाही. या नेकबँडमध्ये ब्लूटूथ 5.0 आणि 10mm डायनॅमिक ड्रायव्हर देण्यात आला आहे. पॉवर बॅकअपसाठी नेकबँडमध्ये एक मजबूत बॅटरी उपलब्ध असेल, जी एकाच चार्जमध्ये 12 तासांचा बॅकअप देते. याशिवाय अॅपल सिरी आणि गुगल व्हॉईस असिस्टंटला एअरफ्री लेस नेकबँडमध्ये सपोर्ट दिला गेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.