Agni 2 5G : स्वदेशी मोबाईल ब्रँडने केला जाळ! लाव्हाने लाँच केला २० हजारांत फ्लॅगशिप स्मार्टफोन

लाव्हाच्या या स्मार्टफोनमध्ये अत्याधुनिक डायमेंसिटी ७०५० प्रोसेसर देण्यात आला आहे.
Lava Agni 2
Lava Agni 2
Updated on

सध्या मोबाईल जगतात मोठ्या प्रमाणात स्पर्धा सुरू आहे. भारतीय बाजारपेठ डोळ्यासमोर ठेऊन कमी किंमतीत जास्त फीचर देण्याचा प्रयत्न कित्येक कंपन्या करत आहेत. यातच आता स्वदेशी मोबाईल कंपनी लाव्हाने मोठी बाजी मारली आहे. कंपनीने सर्वांना परवडणाऱ्या दरात फ्लॅगशिप फीचर असणारा स्मार्टफोन लाँच केला आहे. लाव्हा अग्नी २ असं या फोनचं नाव आहे. पाहूयात काय आहेत याचे फीचर्स.

तगडा प्रोसेसर, जबरदस्त गेमिंग

लाव्हाच्या या स्मार्टफोनमध्ये अत्याधुनिक डायमेंसिटी ७०५० प्रोसेसर देण्यात आला आहे. हा प्रोसेसर वेगवान गेमिंग आणि अ‍ॅप अनुभव प्रदान करतो. यासोबतच अग्नी २ मध्ये थर्ड जेन २९०० मिमी स्क्वेअर व्हेपर चेंबर कूलिंग टेक्नॉलॉजी वापरण्यात आली आहे. यामुळे भरपूर गेमिंग नंतरही फोन अधिक गरम होत नाही.

दिसायला स्टायलिश

अग्नी २ मोबाईलचा कर्व्ह्ड डिस्प्ले हा या स्मार्टफोनला अगदी प्रीमियम लुक देतो. हा डिस्प्ले १२० हर्ट्स रिफ्रेश रेटसह ६.७८ इंचाच्या एफएचडी+ स्क्रीनसह येतो. या सेगमेंटमधला हा सर्वोत्तम कर्व्ह्ड अ‍ॅमोलेड डिस्प्ले असल्याचा दावा कंपनीने केला आहे. डिस्प्लेचा बॉटम बेझल अगदी कमी, म्हणजेच केवळ २.३ एमएम आहे. त्यामुळे स्क्रीन टू बॉडी रेशिओ हा तब्बल ९३.६५% होतो.

Lava Agni 2
स्मार्टफोन पाण्यात पडला तर, चुकूनही करू नका या चुका Smartphone Tips

यासोबतच स्मार्टफोनचे डिझाईन ड्युअल कर्व्ह्ड असल्यामुळे तो हाताळण्यास सोपा आहे. अग्नी २ चा इन-हँड फील अगदी चांगला आहे. तसेच स्मार्टफोनच्या मागच्या बाजूला असलेले प्रीमियम ३डी कलर ग्लास बॅक डिझाईन या स्मार्टफोनला अगदी रिच लुक देते.

क्वाड कॅमेरा सेटअप, तगडी मेमरी

कॅमेऱ्याच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, अग्नी २ स्मार्टफोनमध्ये ५० मेगापिक्सल क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यातील मुख्य कॅमेरा १ मायक्रॉन पिक्सल सेन्सरसह येतो. हा सेन्सर अधिक प्रकाश आत ओढून घेतो, ज्यामुळे कमी उजेडातही चांगले फोटो येतात.

अग्नी २ स्मार्टफोन हा ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. विशेष म्हणजे या फोनची रॅम ही १६ जीबी पर्यंत वाढवता येऊ शकते.

Lava Agni 2
Mobile Hacks: आता मित्रांशी फोनवर बोला फ्री मध्ये, ना इंटरनेट लागणार ना रिचार्ज!

२० हजारांत फ्लॅगशिप

लाव्हा अग्नी २ हा एक ५ जी स्मार्टफोन आहे. या स्मार्टफोनची किंमत ही केवळ २१,९९९ रुपये आहे. लाँच ऑफरमध्ये या फोनवर क्रेडिट आणि डेबिट कार्डने खरेदी केल्यास २००० रुपयांची सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे अवघ्या २० हजारांमध्ये एक फ्लॅगशिप दर्जाचा स्वदेशी स्मार्टफोन उपलब्ध होणार आहे. 'लाव्हा इंटरनॅशनल'चे अध्यक्ष आणि बिझनेस हेड सुनील रैना यांनी याबाबत माहिती दिली.

Lava Agni 2
Vivo Mobile : आता फक्त 600 रुपयांत मिळणार Vivo T2x 5G, Flipkart वरून करा ऑर्डर

जागतिक स्तरावर भारताचे तांत्रिक पराक्रम दाखवण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. अग्नी २ ५जी हा स्मार्टफोन हे उद्दिष्ट साध्य करण्याचा एक टप्पा आहे. या फोनचे जागतिक दर्जाचे फीचर्स भारतीय स्मार्टफोनबद्दल तुमचे मत बदलून टाकेल, असंही रैना यावेळी म्हणाले. २४ मे २०२३ पासून अमेझॉन या वेबसाईटवर हा फोन विक्रीसाठी उपलब्ध होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()