Riot Games Layoff : 'लीग ऑफ लेजंड्स' गेम बनवणाऱ्या कंपनीमध्ये मोठी कामगार कपात; 11 टक्के कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता

रायट गेम्स ही कंपनी टेन्सेंट होल्डिंग्स लिमिटेडच्या मालकीची आहे. कंपनीकडे भरपूर प्रोजेक्ट असून, खूप कमी फोकस असल्याचं कारण रायट गेम्सने दिलं आहे.
Riot Games Layoff
Riot Games LayoffeSakal
Updated on

Riot Games Layoff : लीग ऑफ लेजंड्स ही प्रसिद्ध ऑनलाईन गेम बनवणाऱ्या 'रायट गेम्स'ने मोठी घोषणा केली आहे. या कंपनीमधील 11 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आलं आहे. सोमवारी एका ब्लॉग पोस्टमध्ये कंपनीने या लेऑफची माहिती दिली.

रायट गेम्स ही कंपनी टेन्सेंट होल्डिंग्स लिमिटेडच्या (Tencent Holdings Ltd.) मालकीची आहे. कंपनीकडे भरपूर प्रोजेक्ट असून, खूप कमी फोकस असल्याचं कारण रायट गेम्सने दिलं आहे. "आम्ही शेअरहोल्डर्सना खुश करण्यासाठी किंवा आर्थिक लक्ष्य गाठण्यासाठी नव्हे, तर गरज म्हणून हा निर्णय घेतला आहे" असं कंपनीने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. (League of Legends maker layoff)

कर्मचाऱ्यांना मिळणार सहा महिन्यांचा पगार

या कामगार कपातीचा फटका कंपनीतील सुमारे 530 कर्मचाऱ्यांना बसणार आहे. रायट गेम्स या कर्मचाऱ्यांना मिनिमम सहा महिन्यांचा पगार, कॅश बोनस, करिअर सपोर्ट अशा गोष्टी देणार आहे. तसंच ज्या कर्मचाऱ्यांकडे पर्सनल कम्प्युटर नाही, त्यांना एक कम्प्युटर देखील देण्यात येणार आहे.

Riot Games Layoff
Tech Layoffs : नववर्षाच्या पहिल्या 15 दिवसांमध्येच 46 टेक कंपन्यांनी केली तब्बल 7,500 कर्मचाऱ्यांची हकालपट्टी! - रिपोर्ट

कंपनीचे सीईओ डायलन जडेजा यांनी सांगितलं, की सध्या कंपनीकडे एकाहून अधिक प्रोजेक्ट आहेत. यामुळे एका ठिकाणी लक्ष केंद्रित करणं शक्य होत नाहीये. यामुळे कंपनी आपल्या 'लेजंड्स ऑफ रनेटेरा' या गेमच्या टीममधील काही कर्मचारी कमी करणार आहे. या गेमचा परफॉर्मन्स अपेक्षेपेक्षा खूप खराब असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

रायट फोर्ज होणार बंद

कंपनीने इंडिपेंडंट डेव्हलपर्सना सोबत घेऊन Riot Forge अशी एक सब्सिडरी देखील सुरू केली होती. मात्र. फेब्रुवारीमध्ये येणाऱ्या 'बँडल टेल : अ लीग ऑफ लेजंड्स स्टोरी' नंतर हा प्रोजेक्ट बंद करण्यात येणार आहे. या प्रोजेक्टमध्ये भरपूर चांगल्या गोष्टी आपण केल्या आहेत. मात्र, आता कंपनीला मुख्य गोष्टींवर फोकस करण्याची गरज आहे, असं मत सीईओंनी व्यक्त केलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()