Driving Licence Online : ड्रायव्हिंग लायसन्ससाठी 'असा' करा ऑनलाइन अर्ज, जाणून घ्या प्रक्रिया

Driving Licence Online Process : जर तुम्हालाही त्यासाठी अर्ज करायचा असेल तर सर्वप्रथम तुम्हाला लर्निंग लायसन्ससाठी अर्ज करावा लागेल.
Driving Licence
Driving Licencesakal
Updated on

कोणतीही गाडी तुम्हाला चालवायची असल्यास, तुमच्याकडे गाडी चालविण्याचा परवाना (लायसन्स) असणे गरजेचे आहे. विना परवाना गाडी चालवणे हा कायद्याने गुन्हा मनाला जातो. पूर्वी ड्रायव्हिंग लायसन्स ऑफलाइन बनविले जात असे. पण, आता तुम्ही घरबसल्या ड्रायव्हिंग लायसन्ससाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. 

जर तुम्हालाही त्यासाठी अर्ज करायचा असेल तर सर्वप्रथम तुम्हाला लर्निंग लायसन्ससाठी अर्ज करावा लागेल. लर्निंग लायसन्सनंतर पर्मनंट लायसन्स मिळते. जर तुम्हाला लर्निंग लायसन्सची प्रक्रिया माहित नसेल, तर आज आम्ही तुम्हाला त्याची ऑनलाइन प्रक्रिया सांगणार आहोत. लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स (LLR) साठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, तुम्हाला खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.

1. sarathi.parivahan.gov.in च्या अधिकृत वेबसाइटवर जा.

2. "ऑनलाइन सेवा" टॅबवर क्लिक करा.

3. "लर्निंग लायसन्स" लिंकवर क्लिक करा.

4. तुमचे राज्य निवडा.

5. "अर्जदार" पर्याय निवडा.

6. तुमचा आधार कार्ड नंबर आणि मोबाईल नंबर टाका.

7. "जनरेट ओटीपी" वर क्लिक करा.

8. तुमच्या मोबाईल नंबरवर आलेला OTP एंटर करा.

9. "सबमिट" वर क्लिक करा.

10. आता तुम्हाला एक अर्ज भरावा लागेल.

11. अर्जामध्ये तुमची सर्व वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता, पत्ता आणि इतर आवश्यक माहिती भरा.

11. तुमचा पासपोर्ट साईजचा फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा.

12. “फी” टॅबवर क्लिक करा.

13. तुमच्या राज्य सरकारने ठरवून दिलेली फी भरा.

14. "सबमिट" वर क्लिक करा.

15. तुमचा अर्ज सबमिट केला जाईल. तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती ऑनलाइन ट्रॅक करू शकता.

Driving Licence
Renew Driving Licence: घरबसल्या ड्रायव्हिंग लायसन्स Renew कसं करायचं?

लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:

  • 1. आधार कार्ड

  • 2. पासपोर्ट साईज फोटो

  • 3.स्वाक्षरी

  • 4. फी

लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करण्याची प्रक्रिया साधारणपणे १५ दिवसांत पूर्ण होते.

Related Stories

No stories found.