AI in Judiciary : न्यायपालिका क्षेत्रात AIची एंट्री! ‘लेक्सलेगिस’ सोडविणार कायद्याचा गुंता; नेमकं काय आहे खास? पाहा

Lexlegis AI in Law System : वकिली क्षेत्रात ‘एआय टूल’मुळे गती; काम झाले सोपे
Lexlegis AI in Judiciary
Lexlegis AI in Judiciaryesakal
Updated on

AI in Judiciary : आपण चालवत असलेल्या खटल्याबाबत उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे विविध निकाल, प्रकरणाच्या अनुषंगाने झालेले संशोधन, तसेच विविध कायदेशीर बाबी शोधून काढणे ही मोठी अवघड बाब असते. त्यासाठी वकिलांना मोठा वेळ खर्च करावा लागतो. मात्र, आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या (एआय) सहाय्याने वकिलांचे हेच काम आता सोपे झाले आहे.

‘एआय’च्या क्षमता संशोधनाच्या पलीकडे विस्तारत आहे. कायदेशीर दस्तावेज स्कॅन करून त्याचे विश्‍लेषण करू शकते. तसेच उपलब्ध माहिती माहिती तपासून त्यातील विसंगतीदेखील नमूद करू शकते.

ही बाब लक्षात घेत ‘लेक्सलेगिस’ने ‘लेक्सलेगिस.एआय’ हे एआय टूल तयार केले आहे. हे प्लॅटफॉर्म कायदेशीर व्यावसायिकांना समस्यांचे विशिष्ट समाधान आणि अचूक संदर्भ उपलब्ध करून देण्यात मदत करते. ज्यामुळे भारतातील न्यायालयांसाठी व्यापक खटल्यांची कागदपत्रे संकलित करण्यात प्रत्यक्ष मानवी हस्तक्षेप कमी होर्इल. या प्लॅटफॉर्मचा वापर कायदा क्षेत्रातील फर्म, सरकारी विभाग, कॉर्पोरेट कायदेशीर कंपन्या, एसएमई आणि स्वतंत्रपणे प्रॅक्टीस करत असलेल्या वकील आणि सनदी लेखापालांना करता येणार आहे.

साकार एस. यादव यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या स्टार्टअपमध्ये विश्रुत श्रीवास्तव, प्रवीण सूद यांचादेखील मोलाचा वाटा आहे. ‘लेक्सलेगिस’ सुरू करण्यापूर्वी यादव यांनी राष्ट्रीय न्यायिक संदर्भ प्रणाली (एनजेआरएस)च्या सेंट्रल डेटा प्रोसेसिंग सेंटरचे (सीडीपीसी) नेतृत्व केले आहे.

Lexlegis AI in Judiciary
NASA-ISRO ISS Mission: नासा आणि इस्रोचे अंतराळ मिशन; पण चर्चा फक्त ग्रुप कॅप्टनचीच, कोण आहेत गगनयात्री शुभांशु शुक्ला?

‘लेक्सलेगिस.एआय’चे वैशिष्ट्ये

  • कायदेशीर संशोधनात तांत्रिक अद्ययावतता

  • वेळखाऊ कायदेशीर संशोधन काही सेकंदांत होणार

  • सुमारे १० लाखांहून अधिक कागदपत्रांसह कायदेशीर डेटाद्वारे एलएलएमला समर्पित

  • Askचा वापर करत कायदेशीर संशोधनाची त्वरित उत्तरे मिळणार

Lexlegis AI in Judiciary
Whatsapp Group Call Link : व्हॉट्सॲपमध्ये खास फीचरची एंट्री! ग्रुप कॉल अन् चॅटसाठी ठरणार खूप फायद्याचं,कसं वापरायच पाहा

भारतातील कायदेशीर समस्यांवर तंत्रज्ञान हा उपाय

देशातील न्यायालयांमध्ये प्रलंबित खटल्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे. त्यामुळे पारंपरिक कायदेशीर संशोधन पद्धती अपुरी ठरत आहे. एआयचा वापर करत संशोधनाला लागणारा वेळ बराच कमी होतो. एआय-संचालित साधन वकिलांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी, अधिक गंभीर कामांसाठी वेळ मोकळा ठेवण्याच्या अनुषंगाने आणि कायदेशीर व्यवस्थेला त्रास देणाऱ्या अकार्यक्षमतेचे निराकरण करण्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे, अशी माहिती लेक्सलेगिसचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी साकार एस. यादव यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.