Instagram Scam : इन्स्टावर सेलिब्रिटींचे फोटो लाईक करण्याची नोकरी; ठाण्यातील बेरोजगार तरुणाला घातला ३७ लाखांचा गंडा!

Instagram Like Scam : स्कॅमर्सनी या तरुणाला एका लाईकसाठी ७० रुपये देण्याचं आमिष दाखवलं होतं.
Instagram Like Scam
Instagram Like ScameSakal
Updated on

ठाण्यातून एक नव्या प्रकारचा स्कॅम समोर आला आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या एका तरुणाला, सेलिब्रिटींचे फोटो लाईक करण्याची नोकरी देऊन त्याला ३७ लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. यूट्यूब व्हिडिओ लाईक करुन पैसे कमावण्याच्या स्कॅमचं हे वेगळं रुप यानिमित्ताने समोर आलं आहे.

नोकरी मिळवण्यासाठी या तरुणाने काही ऑनलाईन पोर्टलवर आपला बायोडेटा अपलोड केला होता. यावरुन त्याचा नंबर मिळवत स्कॅमर्सनी त्याला व्हॉटसअ‍ॅपवर मेसेज केला. या मेसेजमध्ये त्याला घरबसल्या नोकरीची ऑफर देण्यात आली होती.

Instagram Like Scam
Online Scam : 'यूट्यूब व्हिडिओ लाईक करुन पैसे कमवा'; १५ हजार भारतीयांची ७०० कोटींना फसवणूक! काय आहे हा स्कॅम?

काय होती ऑफर?

घरी बसून बॉलिवूड सेलिब्रिटींच्या इन्स्टाग्राम पोस्ट लाईक करण्याची ही नोकरी होती. यामध्ये एका लाईकसाठी ७० रुपये देण्यात येतील असं या तरुणाला सांगण्यात आलं होतं. या माध्यमातून दिवसाला दोन ते तीन हजार रुपये कमावता येईल, असं आमिष या तरुणाला दिलं गेलं. (Instagram Job Scam)

काही दिवस मिळाले पैसे

या तरुणाला सांगण्यात आलं होतं, की इन्स्टाग्राम पोस्ट लाईक केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट शेअर करावा. अशा प्रकारे पहिले काही दिवस या तरुणाला त्याच्या कामाचे पैसे दिले गेले. त्याने लाईक केलेल्या फोटोंच्या हिशेबानुसार त्याला रक्कम मिळत होती.

Instagram Like Scam
Job Scam : १५० रुपये मिळवून देत जिंकला विश्वास, थोड्याच दिवसात घातला ४० लाखांना गंडा; या 'जॉब ऑफर' पासून रहा सावध!

खरा झोल सुरू

यानंतर या तरुणाला एका टेलिग्राम ग्रुपला जोडण्यात आलं. हा ग्रुप क्रिप्टोकरन्सीशी संबंधित होता. यासोबतच एका वेबसाईटवर या तरुणाचं अकाउंट उघडून त्याला लॉग-इन आयडी आणि पासवर्ड दिला गेला. याठिकाणी क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करून भरपूर पैसे कमावता येतील असं या तरुणाला सांगण्यात आलं. (Thane Man Scammed)

सुरुवातीला या तरुणाने ९,००० रुपयांची गुंतवणूक केली. तर त्याला ९,९९८ रुपये परत करण्यात आले. यानंतर त्याने ३० हजार रुपये गुंतवले, तर त्याला ८,२०८ रुपये जादा परतावा मिळाला. यामुळे या सर्व प्रकारावर तरुणाचा विश्वास बसला.

Instagram Like Scam
Bachat Gat Scam: महिला सबलीकरणाच्या नावाखाली बारामतीत फसवणूक; आरोपींना 32 लाखांच्या दंडाची शिक्षा...

व्हीआयपी ग्रुप

यानंतर या तरुणाला आणखी एका टेलिग्राम ग्रुपमध्ये घेण्यात आलं. हा व्हीआयपी ग्रुप असून, यात केवळ मोठी रक्कम गुंतवणारेच लोक आहेत असं या तरुणाला सांगण्यात आलं. या तरुणानेही मोठी रक्कम गुंतवण्यास सुरुवात केली, आणि हळूहळू ही रक्कम ३७ लाखांपर्यंत गेली. यानंतर पैसे काढता येत नसल्याचं पाहून आपली फसवणूक झाल्याचं या तरुणाच्या लक्षात आलं.

त्यानंतर या तरुणाने पोलिसांमध्ये धाव घेतली. पोलिसांनी मिळालेल्या तक्रारीनुसार तपास सुरू केला आहे. देशात यूट्यूब व्हिडिओ लाईक करून, गुगल रिव्ह्यू देऊन पैसे कमावण्याचं आमिष दाखवणारे स्कॅम मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. यातच आता आणखी एका स्कॅमची भर पडली आहे. त्यामुळे अशा फसवणूक करणाऱ्या मेसेजसकडे दुर्लक्ष करणंच योग्य आहे.

Instagram Like Scam
ZamZam iPhone Scam : 'बडे भाई मोफत आयफोन १४ देतायत' म्हणत गुजराती तरुणाला घातला ७ लाखांचा गंडा! पाकिस्तानी हॅकरचा कारनामा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.