LinkedIn AI : लिंक्ड-इनवर पहिला मेसेज काय पाठवायचा सुचत नाही? कंपनीचं एआय फीचर करेल तुमची मदत

हे एआय टूल तुमची आणि ज्या व्यक्तीला तुम्ही मेसेज पाठवणार आहात त्या व्यक्तीची प्रोफाईल तपासून; तुम्हाला योग्य असा ओपनिंग मेसेज तयार करुन देतं.
LinkedIn AI
LinkedIn AIeSakal
Updated on

LinkedIn AI Features : नोकरी शोधण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या अग्रगण्य प्लॅटफॉर्ममध्ये लिंक्डइनचा समावेश होतो. याठिकाणी मोठमोठ्या कंपन्यांचे अधिकारी, एचआर यांचे प्रोफाईल आहेत. त्यांपैकी कित्येक लोक इनबॉक्समध्ये चर्चा देखील करतात. मात्र, या मोठ्या व्यक्तींना इनबॉक्समध्ये पहिला मेसेज काय करायचा हेच कित्येक तरुण-तरुणींना माहिती नसतं.

यासाठीच आता लिंक्डइनने नवीन एआय फीचर लाँच केलं आहे. हे एआय टूल तुमची आणि ज्या व्यक्तीला तुम्ही मेसेज पाठवणार आहात त्या व्यक्तीची प्रोफाईल तपासून; तुम्हाला योग्य असा ओपनिंग मेसेज तयार करुन देतं. हा मेसेज पाठवण्यासाठी यूजर्स त्याला एडिट देखील करू शकतात. यामुळे लिंक्ड-इनवर आईस ब्रेक करणं सोपं जाणार आहे. (Linkedin AI Feature for first message)

लिंक्डइनचे प्रॉडक्ट सीनियर डिरेक्टर नमन गोयल यांनी याबाबत माहिती दिली. "लिंक्डइनवर कित्येकांसाठी पहिला मेसेज पाठवणे हीच मोठी समस्या असते. यामुळे आम्ही हे प्रीमियम फीचर लाँच केलं आहे. याचा यूजर्सना भरपूर फायदा होईल. केवळ नोकरी शोधणाऱ्यांनाच नाही, तर रिक्रुटर्सना देखील या फीचरचा फायदा होणार आहे", असं ते म्हणाले.

LinkedIn AI
HALO AI Headband : आता स्वप्नांवर राहणार तुमचं नियंत्रण, 'एआय'ची होणार मदत.. हेडबँड कंपनीचा मोठा दावा!

'कॅच अप' टॅब

लिंक्डइन आपल्या यूजर्ससाठी आणखी एक फीचर लाँच करत आहे. यामुळे एखाद्या कनेक्शनसोबत खूप दिवसांनी बोलणं सुरू करणं सोपं जाणार आहे. त्या व्यक्तीच्या संपर्कात राहण्यासाठी लिंक्डइन तुम्हाला काही ठराविक कारणं देईल. वर्क अ‍ॅनिव्हर्सरी किंवा इतर गोष्टींची माहिती तुम्हाला देऊन, त्याबाबत अभिनंदन करणारा मेसेज देखील हे एआय तयार करू शकेल. यामुळे तुम्हाला लोकांशी संपर्क कायम ठेवणं सोपं जाणार आहे. (Linkedin Catch-up tab)

प्रीमियम फीचर

लिंक्डइनचे हे एआय फीचर्स केवळ प्रीमियम यूजर्सना मिळणार आहेत. यामुळे यूजर्स आपल्या कनेक्शनमध्ये नसणाऱ्या व्यक्तींना देखील मेसेज करू शकणार आहेत. (LinkedIn Premium)

LinkedIn AI
Cyber Security : एआय अ‍ॅप्स आणि स्मार्ट होममुळे लहान मुलांना अधिक सायबर धोका; रिपोर्टमध्ये बाब उघड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.