LinkedIn वर फेक ऑफर्स आणि फिशिंगचा सुळसुळाट, रिपोर्टमध्ये दावा! नोकरी शोधताना घ्या खबरदारी

जगभरातील सुमारे ५६ टक्के कंपन्यांनी लिंक्डइनवर वर्षाला किमान एक स्कॅम रिपोर्ट केला आहे.
LinkedIn Fake job Scam
LinkedIn Fake job ScamEsakal
Updated on

नोकरी शोधण्यासाठी बरेच जण वेबसाईट्स, आणि अ‍ॅप्सची मदत घेतात. यामध्ये लिंक्डइन (LinkedIn) हे अ‍ॅप बरंच लोकप्रिय आहे. मात्र, तुम्हीदेखील जर लिंक्डइनच्या मदतीने जॉब सर्च करत असाल, तर तुम्हाला सावध व्हायची गरज आहे. कारण या अ‍ॅपवर फेक ऑफर्स आणि फिशिंग स्कॅम होण्याचं प्रमाण वाढलं आहे.

नॉर्डलेयर (NordLayer) या नेटवर्क सिक्युरिटी सोल्यूशन पुरवणाऱ्या वेबसाईटने एक रिपोर्ट जारी केला आहे. या रिपोर्टमध्ये लिंक्डइन वरील स्कॅमची माहिती दिली आहे. जगभरातील सुमारे ५६ टक्के कंपन्यांनी लिंक्डइनवर वर्षाला किमान एक स्कॅम रिपोर्ट केला आहे.

LinkedIn Fake job Scam
IRCTC Recruitment 2023 : रेल्वेत विना परीक्षा मिळणार नोकरी, वॉकइन इंटर्व्यूव्हने करणार भरती

फेक जॉब ऑफर

या रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, लिंक्डइनवर सर्वाधिक होणारा स्कॅम (LinkedIn Scam) म्हणजे फेक जॉब ऑफर्स. याठिकाणी दर सेकंदाला ११७ जॉब अ‍ॅप्लिकेशन्स पोस्ट होतात. स्कॅमर्स खोट्या जॉब पोस्टिंग करून असे अ‍ॅप्लिकेशन्स कलेक्ट करतात. या माध्यमातून आर्थिक फसवणूक किंवा डेटा चोरी अशा प्रकारचे स्कॅम होऊ शकतात.

फिशिंग

लिंक्डइनवर होणाऱ्या स्कॅममध्ये फिशिंगचा प्रकारही दिसून येतो. यामध्ये स्कॅमर एखाद्या कंपनीच्या नावाने, किंवा कंपनीतील अधिकारी म्हणून अकाउंट सुरू करतो, आणि जॉब शोधणाऱ्या व्यक्तींना मेसेज करून माहिती मागवतो. यासोबतच, या माध्यमातून धोकादायक लिंक्स पाठवणे, एखाद्या कंपनीची बदनामी करणे असे प्रकारही होतात.

LinkedIn Fake job Scam
Job Alert : सशस्त्र सीमा दलात १०वी, १२वी उत्तीर्णांना संधी

लिंक्डइनवर होणाऱ्या घोटाळ्यांपैकी फेक जॉब ऑफर हा सर्वाधिक (४८ टक्के) दिसून आलेला स्कॅम (LinkedIn fake job offers) आहे. तर खराब झालेली प्रतिमा हा या घोटाळ्यांचा सर्वाधिक परिणाम (४८ टक्के) होता.

सुमारे ४५ टक्के कंपन्यांना लिंक्डइनवरील स्कॅमबाबत माहिती असल्याचं या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. विशेष म्हणजे, लहान कंपन्यांसोबत असा प्रकार अगदी कमी प्रमाणात झाला. आपल्या संस्थेत कोणालाही असा अनुभव आला नसल्याचं ५२ टक्के कंपन्यांनी स्पष्ट केलं.

LinkedIn Fake job Scam
Tax SMS Scam : सावधान! इन्कम टॅक्स रिटर्न भरताना केलेली ही चूक महागात पडेल, लुटारू टोळीची नजर तुमच्यावर?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.