Sangola News : जगातील टॉप 2 टक्के शास्त्रज्ञांच्या यादीत सांगोला तालुक्यातील शास्त्रज्ञ प्रा. डॉ. चंद्रकांत हरी भोसले यांचा समावेश

सांगोला तालुक्यातील महूद येथील प्रा. डॉ.चंद्रकांत भोसले यांनी अत्यंत हालाखीतून शिक्षण पूर्ण केले
list of top 2 percent scientists in world scientist from Sangola taluk Prof Dr Chandrakant Hari Bhosle​
list of top 2 percent scientists in world scientist from Sangola taluk Prof Dr Chandrakant Hari Bhosle​sakal
Updated on

महूद : अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या सर्वेक्षणानुसार जगातील टॉपच्या दोन टक्के शास्त्रज्ञांच्या यादीत महूद (ता. सांगोला) येथील प्रा. डॉ. चंद्रकांत हरी भोसले यांचा समावेश करण्यात आला आहे. पाणी शुद्धीकरणावर काम करणाऱ्या प्रा. डॉ. भोसले यांचेसह सर्वांच्या गौरवाची आहे.

सांगोला तालुक्यातील महूद येथील प्रा. डॉ.चंद्रकांत भोसले यांनी अत्यंत हालाखीतून शिक्षण पूर्ण केले.शिवाजी विद्यापीठाच्या कमवा आणि शिका योजनेतून त्यांनी पदार्थ विज्ञान विषयातून एम.एस.सी. केले.रामानंदनगर (किर्लोस्करवाडी) येथे सेवेची सुरुवात केल्यानंतर पुढे शिवाजी विद्यापीठाच्या पदार्थविज्ञान विभागात त्यांची नियुक्ती झाली.त्यांचे संशोधनाचे कार्य अखंडपणे चालू आहे. त्यांचे २१७ शोधनिबंध जागतिक दर्जाच्या वैज्ञानिक नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत.त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी विद्यापीठातून २७ विद्यार्थ्यांनी पीएचडी मिळवली आहे.

सन २०१० ते २०१३ या कालावधीत ते पदार्थ विज्ञान विभागाचे प्रमुख होते. त्यांच्याच कार्य काळामध्ये शिवाजी विद्यापीठाच्या पदार्थविज्ञान विभागासाठी सात कोटी रुपयांचे अनुदान प्राप्त होऊन या अनुदानातून शिवाजी विद्यापीठात पी.आय.एफ.सी. तयार करण्यात आले आहे.विविध विषयावर संशोधन करणारे विद्यार्थी या पी.आय.एफ.सी.सेंटरचा लाभ घेत आहेत. सेवानिवृत्तीनंतरही त्यांना दिल्ली येथील विद्यापीठ अनुदान मंडळाने तीन वर्षासाठी मूलभूत वैज्ञानिक सहकारी म्हणून मुदतवाढ दिली होती.यानंतर काही काळ ते संजय घोडावत विद्यापीठामध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत होते.

list of top 2 percent scientists in world scientist from Sangola taluk Prof Dr Chandrakant Hari Bhosle​
Sangola News : टेंभूचे पाणी माण नदीत पोहोचल्याने पाणी पूजन व फटाके फोडून झाला जल्लोष

त्यांनी डॉ.मायकेल न्यूमन स्पोलार्ट यांच्याबरोबर पाणी शुद्धीकरणावर संशोधनाचे काम केले.त्यांनी अमेरिका (सन १९९०), झेक रिपब्लिक (२००७),चीन (२००७),कॅनडा(२०२०)अशा विविध देशांना तेथील सरकारी निमंत्रणावरून भेटी दिल्या आहेत.प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत भोसले यांचे अनेक विद्यार्थी परदेशात चांगल्या जागांवर कार्यरत आहेत.प्रा.डॉ.चंद्रकांत भोसले यांच्या या यशाबद्दल सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.डॉ.भोसले यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

प्राध्यापक डॉक्टर भोसले यांचे संशोधन -

नऊ सेल असलेले पाणी शुद्धीकरण उपकरण त्यांनी तयार केले आहे. हे उपकरण सूर्यप्रकाशात ठेवून त्यामधून घाण पाणी फिरवले तर ते पाणी शुद्ध होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.