Upcoming Phones: नवीन फोन खरेदी करायचाय? काही दिवस थांबा, जानेवारीत एंट्री करणार 'हे' हटके डिव्हाइस

नवीन फोन खरेदी करण्याचा विचार असल्यास काही दिवस वाट पाहणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल. जानेवारी २०२३ मध्ये अनेक शानदार फोन्सची बाजारात एंट्री होणार आहे.
Upcoming Phones
Upcoming PhonesSakal
Updated on

List of Upcoming Phones in January 2023: नवीन फोन खरेदी करण्याचा विचार असल्यास काही दिवस वाट पाहणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल. जानेवारी २०२३ मध्ये अनेक शानदार फोन्सची बाजारात एंट्री होणार आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात रेडमी, पोको, आइकू आणि सॅमसंग सारख्या कंपन्या स्मार्टफोन लाँच करणार आहेत. जानेवारी महिन्यात लाँच होणाऱ्या या फोन्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

Upcoming Phones
Safest Cars in India: भारतातील टॉप-5 सुरक्षित कार, अपघातानंतरही चालक-प्रवासी राहतील सेफ

रेडमी नोट १२ सीरिज

रेडमी आपल्या अपकमिंग नोट १२ सीरिजला जानेवारीत लाँच करणार आहे. या स्मार्टफोन्समध्ये तुम्हाला फुल एचडी प्लस रिझॉल्यूशनसह ६.६७ इंच पंच-होल ओलेड डिस्प्ले मिळेल. तर फोटोग्राफीसाठी ४८ मेगापिक्सल मुख्य कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा दिला जाईल. तर सेल्फीसाठी ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. नोट १२ प्रो मध्ये ५० मेगापिक्सलचा आणखी एक कॅमेरा दिला जाऊ शकतो. फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ४ झेन १ चिपसेटचा सपोर्ट मिळेल.

सॅमसंग गॅलेक्सी F04

सॅमसंग या फोनला कमी बजेटमध्ये लाँच करणार आहे. या फोनची किंमत ८ हजार रुपये असू शकते. फोनमध्ये ६.५ इंच डिस्प्ले, ड्यूल रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल. यात ८ जीबीपर्यंत व्हर्च्यूअल रॅमचा देखील सपोर्ट दिला जाईल. फोनचे फीचर्स जवळपास एम०४ सारखे असतील.

हेही वाचा: क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

iQOO 11 सीरिज

iQOO च्या या फोनमध्ये ६.७८ इंच ई६ एमोलेड डिस्प्ले देण्यात आला असून यात २के रिझॉल्यूशन आणि HDR10+ चा सपोर्ट मिळेल. यात फ्लॅट डिस्प्ले पॅनेल आणि प्रो व्हेरिएंटमध्ये कर्व्ड डिस्प्ले दिला जाईल. तसेच, LPDDR5x रॅम आणि UFS ४.० चा सपोर्ट मिळेल. आइकू ११ सीरिज ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आणि २०० वॉटपर्यंत फास्ट चार्जिंग सपोर्टसह येऊ शकते.

पोको C50

पोको C50 स्मार्टफोन पुढील महिन्यात बाजारात एंट्री करेल. हा हँडसेट सी३१ चा सक्सेसर असू शकतो. रिपोर्टनुसार, फोनमध्ये ऑक्टाकोर प्रोसेसरसह ६००० एमएएचची दमदार बॅटरी दिली जाईल. यात शानदार डिस्प्ले देखील मिळेल. या फोन्सची किंमत खूपच कमी असण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: Pebble Watch: अवघ्या ४ हजारात Apple Watch Ultra सारखे घड्याळ, कॉलिंगचाही सपोर्ट; पाहा फीचर्स

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.