आता WhatsApp च्या वेब व्हर्जनवर लॉग इन करणे खूप सोपे झाले आहे. पूर्वीच्या वापरकर्त्यांना WhatsApp वेबवर लॉग इन करण्यासाठी स्मार्टफोनची आवश्यकता होती. यासोबतच तुमच्या डिव्हाईसमध्ये , इंटरनेट चालणे आवश्यक होते. पण आता WhatsApp वर मल्टी-डिव्हाइस फीचर आल्याने हा त्रास संपला आहे. हे फीचर अँड्रॉइड आणि आयओएस डिव्हाईससाठी रिलीज करण्यात आले आहे.
इंटरनेटशिवाय असे चालवा WhatsApp
नवीन फीचर आल्यानंतर तुमच्या स्मार्टफोनमध्ये इंटरनेट नसले तरी तुमचे व्हॉट्सअॅप अकाउंट डेस्कटॉपवर सुरूच राहील. तसेच डेस्कटॉपला इंटरनेट कनेक्टिव्हिटी आवश्यक असेल. यासाठी तुम्हाला मल्टी-डिव्हाइस बीटा प्रोग्राम सुरु करावा लागेल. ते करण्यासाठी, फोनवर व्हॉट्सअॅप उघडा आणि Linked Devices ऑप्शनवर जा. येथे तुम्हाला बीटा प्रोग्राममध्ये जॉईन करण्याचा पर्याय मिळेल.
तुम्हाला फक्त मल्टी-डिव्हाइस फीचर निवडावे लागेल आणि तुम्हाला ज्या डिव्हाइसवर WhatsApp वेब वापरायचे आहे त्यावरील QR कोड स्कॅन करावा लागेल त्यानंतर तुम्हाला वाटल्यास फोनवरून इंटरनेट देखील बंद करू शकता आणि आपले व्हॉट्सअॅप वेब खाते चालू राहील. जोपर्यंत तुम्ही स्वतः त्या PC वरून लॉगआउट करत नाही तोपर्यंत तुमचे WhatsApp खाते ब्राउझरवर दिसेल. नवीन फीचर Windows 10, Windows 11 आणि macOS वर सपोर्ट करते.
या गोष्टींची काळजी घ्या
तुमचे व्हॉट्सअॅप वेब अकाउंट फक्त 14 दिवसांसाठी लॉग इन केले जाईल, त्यानंतर तुमचा QR कोड पुन्हा स्कॅन करावा लागेल. हे फीचर Android डिव्हाइसवर चालते, मात्र iOS डिव्हाइससाठी काही मर्यादा आहेत. Android डिव्हाइसशी लिंक केलेले असताना, तुम्ही वेब पोर्टलवरून मेसेज आणि थ्रेड डिलीट करु शकता. पण iOS च्या बाबतीत असे नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.