Discovery : अष्मयुगातील अनेक प्राणी,पक्षी आणि घडामोडींसंबंधी संशोधन होतच असते.अश्यातच पाषाण युगातील प्राणिकांवर संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांना अमेरिकेच्या उत्तरेकडील मोंटाना प्रदेशात ज्वालामुखीच्या भूगर्भातून एका अनोख्या शाकाहारी डायनासोरच्या अवशेषांचा शोध लागला आहे. या नवीन प्रजातीचे वैज्ञानिक नाम "Lokiceratops rangiformis" असे असून, त्यांनी या आकर्षक डायनासोराला "लाेकि राजा" असे सार्थक नाव दिले आहे.
हे नाव त्याच्या डोक्यावर असलेल्या वळेच्या शिंगांवरून आणि त्याच्या गोंडणावरील अनोख्या आकाराच्या, सुमारे दोन फूट लांबीच्या सुरीच्या आकाराच्या शिंगांवरून पडले आहे. या वैशिष्ट्यपूर्ण शिंगांमुळेच त्याची तुलना नॉर्स पुराणातला कुटियाखोर देव "लोकी" याच्याशी केली गेली.
सुमारे 22 फूट लांबीचा आणि 5.5 टन वजनाचा हा लाेकि राजा शाकाहारी होता. तो फर्न आणि फुलांची वनस्पती खाऊन जीवन जगत होता. याच्या जबड्यावरून अंदाज येतो की तो आपले शक्तिशाली जबडे वापरून कठीण वनस्पती चघळत असेल.
गेल्या 7.8 कोटी वर्षांपूर्वीच्या हवामानानुसार, तेव्हाच्या उप-उष्णकटिबंधीय प्रदेशात हा लाेकि राजा वावरत होता. आणखी मनोरंजक बाब म्हणजे याच प्रदेशात त्याच्यासोबत आणखी चार वेगवेगळ्या जातींचे शिंग असलेले डायनासोर आढळले आहेत. इतक्या कमी भौगोलिक परिसरात इतक्या प्रजातींचा वास असणे हे खरोखर आश्चर्यकारक आहे. यावरून असा निष्कर्ष निघतो की या ठिकाणी डायनासोरच्या जातींचा जलद विकास होत होता.
लाेकिक राजाच्या शोधाने आपल्याला प्राचीन पृथ्वीवरील जैवविविधतेची आणि परिसंस्थेची अधिक चांगली माहिती होण्यास मदत होईल. तसेच, हा शोध आधुनिक आफ्रिकेतील जनावरांच्या उत्क्रांतीशी सुसंगतता दाखवतो.या शोधामुळे लोकांमध्ये या डायनासोरबद्दल जाणून घेण्याची अधिक उत्सुकता वाढली आहे.असे डायनासॉरचे शोध खूपच कमी लागतात आणि त्यांच्या विशेषतः या तुम्हाला आश्चर्यात टाकणाऱ्या असतात,असे शास्त्रज्ञांनी सांगितले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.