कमी बजेटमध्ये दमदार स्मार्टफोन; मल्टीटास्किंग साठी आहेत बेस्ट

Realme Narzo 50
Realme Narzo 50Sakal
Updated on

जर तुम्ही स्वत:साठी स्मार्टफोन विकत घेण्याचा विचार करत असाल पण तुमचे बजेट ठरलेले असेल तर आज आपण अशा स्मार्टफोन्सची यादी पाहणार आहोत जे कमी बजेटमध्ये दमदार परफॉर्मंस देतात. पावरफुल ऑक्टा कोअर प्रोसेसरसह येणारे हे स्मार्टफोन मल्टीटास्किंगसाठी बेस्ट आहेत. कमी किमतीत मिळणारे हे अँड्रॉइड फोन तुम्हाला 49 तासांपर्यंत चालणारी बॅटरी लाईफ देतात, सोबतच पाण्यात पडल्यास देखील पूर्णपणे सुरक्षित राहतात.

realme narzo 50i

हा कमी किमतीत मिळणारा स्मार्टफोन कार्बन ब्लॅक आणि मिंट ग्रीन या दोन कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे. त्याची डिस्प्ले स्क्रीन इतकी मोठी आहे की तुम्ही त्यावर गेम्स आणि मूव्हीज पाहण्याचा आनंद घेऊ शकता. तसेच याची बॅटरी स्टँडबायमध्ये 43 दिवस टिकते. याच्या पावरफुल ऑक्टा कोअर प्रोसेसरमुळे, तुम्ही मल्टीटास्कचा आनंद घेऊ शकता.

Samsung Galaxy M21 2021 Edition

या Samsung स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 6000 mAh बॅटरी मिळते जी 22 तासांपर्यंत इंटरनेट वेळ आणि 29 तासांपर्यंत व्हिडिओ प्ले टाईम देते. या फोनची बॅटरी 15W चार्जिंगसह 121 तासांपर्यंत म्युझिक प्ले टाइम आणि 49 तासांपर्यंत टॉकटाइमला सपोर्ट करते. सुपर शार्प 48MP ट्रिपल कॅमेरा वापरुन तुम्ही फोटोग्राफीचा आनंद देखील घेऊ शकता.

Realme Narzo 50
बजेटमध्ये बसणारी इलेक्ट्रिक बाइक शोधताय? हे आहेत बेस्ट ऑप्शन्स

OPPO A31

हा स्मार्टफोन 3 कार्ड स्लॉटसह येतो, ज्यामध्ये तुम्ही 2 ड्युअल सिम आणि 256GB एक्स्ट्रा मेमरीसाठी 1 मायक्रो एसडी वापरू शकता. या कमी बजेट स्मार्टफोनच्या 4230mAh बॅटरीसह, तुम्ही दिवसभर व्हिडिओ गेम्स आणि गाण्यांचा आनंद घेऊ शकता. फुल चार्ज केल्यानंतर 14 तासांपर्यंत HD व्हिडिओ ऑनलाइन पाहू शकता किंवा 7 तासांपर्यंत गेम खेळू शकता. त्याचा 8MP फ्रंट एआय ब्युटीफिकेशन कॅमेरा वय आणि जेंडर ओळखून आपोआप सेल्फी कस्टमाइज करतो.

Redmi Note 10

या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला साइड माऊंटेड फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आले असून हा स्मार्टफोन चार कलर व्हेरियंटमध्ये उपलब्ध आङे - अरोरा ब्लू, शॅम्पेन व्हाइट, इंटरस्टेलर ब्लॉक आणि ग्लेशियर व्हाइट. त्याच्या 48MP वाइड प्रायमरी कॅमेराने तुम्ही नाईट मोड, प्रो कलर फोटो आणि प्रो व्हिडिओ काढू शकता. नॅनो कोटिंग टेक्नोलॉजीसह येणारा, हा स्मार्टफोन वजनाने हलका असून पाण्यात भिजल्यास देखील सुरक्षित राहतो.

Realme Narzo 50
Jio, Airtel आणि Vi चे 400 रुपयांत मिळणारे बेस्ट प्लॅन्स; वाचा डिटेल्स

Redmi 9 Active

हा स्वस्तातला स्मार्टफोन IPS डिस्प्ले आणि 6.53 इंच फुल HD सह येतो, कार्बन ब्लॅक, मेटॅलिक पर्पल आणि कोरल ग्रीन या तीन कलर ऑप्शन्समध्ये तो उपलब्ध आहे. अँटी स्लिपसह युनिक ग्रिप डिझाइन असलेला हा कमी किमतीचा अँड्रॉइड फोन हातात चांगली ग्रीप देतो. याच्या मदतीने तुम्ही अप्रतिम फोटो क्लिक करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.