Pune News : सण-उत्सव किंवा आनंदाचा कोणताही क्षण असला की घरातील तसेच कार्यक्रम स्थळावर रांगोळी हा त्या शुभकार्याचा एक अविभाज्य भाग झालेला आहे. मात्र बदललेली जीवनशैली आणि कामाच्या ओघात शहरी भागातील अनेक घरांत रांगोळी काढण्याचे प्रमाण कमी होताना दिसते.
रांगोळीमुळे घराची वाढणारी शोभा आणि त्यातून मिळणारे आत्मिक सुख या दोन्ही बाबींचा विचार करत मोठा वेळ रांगोळीवर खर्च केला जातो. मात्र अनेकांकडे असलेली वेळेची कमी विचारात घेऊन रांगोळीला तंत्रज्ञानाचा टच देण्याचा विचार ‘लुनोम’ या स्टार्टअपने केला.
रांगोळीत ऑटोमेशन कसे येर्इल व ते तंत्रज्ञान केवळ रांगोळीपुरते मर्यादित न राहता त्यातून कल्पकता कशी वाढेल व मानसिक शांतता देखील मिळवून देता येर्इल या बाबींचा विचार स्टार्टअपचे संस्थापक सागर आगवणे यांनी केला.
त्यानंतर अनेक महिने संशोधन व विविध प्रयोग करत जुनी रांगोळी नव्या रूपात आणण्यासाठी आगवणे यांनी एका टेबलची निर्मिती केली. हा टेबल एका लाकडाच्या तुकड्यापासून तयार करण्यात आला आहे. टेबलच्या आत ऑटोमेशनचा वापर करून तयार करण्यात आलेली प्रणाली बसविण्यात आली आहे.
त्याच्या माध्यमातून टेबलच्या पृष्ठभागावर रांगोळीचे चित्रण सुरू असते. ते चित्रण एका ॲप्लिकेशनद्वारे नियंत्रित केले जाते. ॲप्लिकेशनमुळे आपल्याला रांगोळीच्या वेगवेगळ्या डिझाईन, गाणी आणि लाइट बदलता येतात. पृष्ठभागावर चुंबकीय तत्त्वावर असलेला लहान आकाराचा लोखंडी गोळा सतत फिरत असतो. त्यामुळे वेगवेगळ्या डिझाईन असलेल्या रांगोळी तयार होतात.
आगवणे हे गेल्या १५ वर्षांपासून आयटी क्षेत्रात कार्यरत आहे. सुरुवातीला ते ग्राफिक डिझायनर होते. कलेची आवड असल्याने कोरोना काळात अद्ययावत पद्धतीने रांगोळी कशी काढता येर्इल याचा विचार केला आणि त्यातून ‘लुनोम’ची सुरुवात झाली.
छोट्या लोखंडी गोळ्याच्या माध्यमातून रांगोळी तयार होते
स्क्रीन टाइम कमी करून एकाग्रता वाढवण्यास मदत होते
ध्यान करता येते
परंपरा, अध्यात्म, आदरातिथ्य यांचा मिलाप
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.