AI Technology : मागल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर आणि सामान्य लोकांमध्ये चर्चेतला एक कॉमन विषय म्हणजे AI (Artificail Intellifence). AI टेक्नॉलॉजीमध्ये मायक्रोसॉफ्ट, गूगल आणि बिंगने मागल्या काही दिवसांत त्यांचे चॅटबॉट्स लाँच करत लोकांना चकीत केलं आहे.
भविष्यात क्रांतीकारी बदलांची एक झलक लोकांना या चॅटबॉटमधून दिसून येतेय. अशाच एका नव्या टेक्नॉलॉजीचा वापर आता व्हॉट्सअॅपमध्ये केला जाणार आहे ज्यातून व्हॉट्सॲपद्वारे डोळ्यांची टेस्टींग केली जाणार असून तुमच्या डोळ्यांचे आरोग्य आणि डोळ्यांचे आजार तपासले जाईल.
नुकतीच उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथे G20 ची बैठक झाली, ज्यामध्ये हे नवीन तंत्रज्ञान प्रदर्शित करण्यात आले. हे तंत्रज्ञान तयार करणाऱ्या स्टार्टअप 'लागी' (AI) ने कृत्रिम बुद्धिमत्ता आणि व्हॉट्सअॅपवर आधारित सिस्टिम विकसित केल्याचा दावा केला आहे, ज्याचा वापर डोळ्यांचे आजार शोधण्यासाठी केला जाऊ शकतो.
या स्टार्टअपचे सह-संस्थापक प्रियरंजन घोष यांनी दावा केला आहे की, ग्रामीण भागातील लोकांना अनेकदा डोळ्यांच्या समस्यांचा सामना करावा लागतो आणि योग्य वेळी डॉक्टर किंवा हॉस्पिटलची मदत न मिळाल्याने परिस्थिती गंभीर बनते. अशा परिस्थितीत जर एखाद्याला मोतीबिंदूचा त्रास होत असेल किंवा डोळ्यांशी संबंधित समस्या असतील तर घाबरण्याची अजिबात गरज नाही. कारण आता हे आजार व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून ओळखता येणार आहेत.
प्रियरंजन घोष म्हणाले की, ही टेक्नॉलॉजी 2021 मध्ये विकसित केली गेली आहे आणि सध्या विदेशात यावर काम चालू आहे. याद्वारे आतापर्यंत 1100 लोकांची तपासणी करण्यात आली आहे. ही टेक्नॉलॉजी व्हॉट्सअॅपद्वारे सोप्या पद्धतीने तपासणी करते. रुग्णाच्या डोळ्याचा फोटो काढताच मोतीबिंदू कळेल. या आधारे रुग्ण डॉक्टरांकडे जाऊन सल्ला घेऊ शकतो.
व्हॉट्सअॅपला आता AI ने जोडण्यात आलेय
त्याच वेळी, या स्टार्टअपच्या संचालिका निवेदिता तिवारी यांनी सांगितले की, हे अॅप्लिकेशन व्हॉट्सअॅपशी जोडले गेले आहे, कारण व्हॉट्सअॅप जवळजवळ प्रत्येकाकडे आहे. नंतर, अॅप्लिकेशन्स (अॅप्स) देखील लाँच केले जातील.
व्हॉट्सअॅपमध्ये एक नंबर तयार करण्यात आला आहे, ज्याला 'कॉन्टॅक्ट' म्हणतात. या कॉन्टॅक्टमध्ये, आम्ही आमचे तंत्रज्ञान एकत्रित केले आहे, ज्याला 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स कॅटरेक्ट स्क्रीनिंग सोल्यूशन' म्हणतात. ते व्हॉट्सअॅपवर जोडून, आम्ही आमच्या यूजर्सना कॉन्टॅक्ट पाठवतो.
कॉन्टॅक्ट रिसीव्ह होताच त्या व्यक्तीला बेसिक माहिती विचारली जाते. व्हॉट्सअॅप बॉटद्वारे नाव, लिंग आणि इतर गोष्टी विचारल्या जातात. ही माहिती दिल्यानंतर डोळ्यांचा फोटो काढावा लागतो. स्क्रिनींग चांगले व्हावे म्हणून त्याला गाईड लाईन दिली जाते. ती व्यक्ती आपला फोटो बॉटला पाठवते. फोटो मिळताच, त्या व्यक्तीला मोतीबिंदू आहे की नाही हे बॉट रिअल टाइममध्ये सांगतो. मोतीबिंदू जास्त परिपक्व किंवा कमी किंवा मोतीबिंदू आहे की नाही तेसुद्धा कळते. यानंतर रुग्णाला डॉक्टरांकडून औषध आणि शस्त्रक्रिया करता येईल. (technology)
आर्टिफिशियल इंटेलिजन्स व्हॉट्सअॅप ही चांगली प्रक्रिया असल्याचे वरिष्ठ नेत्रचिकित्सक डॉ.संजयकुमार विश्नोई सांगतात. ही सुविधा विशेषतः दुर्गम भागांसाठी चांगली आहे. हा डेटाबेस आहे. ज्या दुर्गम भागात सुविधा उपलब्ध नाहीत त्यांच्यासाठी हे खूप प्रभावी आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.