महिंद्रा (Mahindra) स्काॅर्पिओ सर्वात लोकप्रिय कारपैकी एक आहे. कंपनी आता तिचे नवीन जनरेशन माॅडल लाँच करण्यावर काम करित आहे. ही गाडी टेस्टिंगच्या शेवटच्या टप्प्यात आहे. यापूर्वी अनेकदा चाचणीच्या दरम्यान स्काॅर्पिओ दिसली आहे. आता याबाबत नवीन अपडेट समोर आले आहेत. कार शेवटच्या चाचणी दरम्यान दिसली आहे. तिची लाँचिंग २०२२ मध्ये होण्याची शक्यता आहे. अद्ययावत स्पाय इमेजमध्ये आगामी स्काॅर्पिओच्या एक्सटिरिअर खूपच मोठे दिसत आहे. मात्र तिचा बहुतेक भाग नवीन छायाचित्रात लपलेला दिसत आहे. पूर्ण डिझाईन आणि तंत्रज्ञानाच्या बाबत सध्याच्या माॅडलच्या तुलनेत नवीन जनरेशन महिंद्रा स्काॅर्पिओ डंका वाजवणार असे वाटते. यात नवीन डिझाईन, फ्रंट ग्रिल आणि नवीन डिझाईन केलेले लाईट पाहायला मिळेल. (Mahindra Scorpio 2022 Image Spotted During Testing)
याबरोबरच एसयूव्हीला नवीन अवतारासाठी अलाॅय व्हिलचे डिझाईनही असेल. त्यात अद्ययावत इन्फोटेन्मेंट सिस्टिमसह पूर्णपणे नवीन डॅशबोर्ड राहिल. तसेच स्पाय छायाचित्रातून दिसते की नवीन स्काॅर्पिओत पूर्ण डिजिटल इंस्ट्रुमेंट कन्सोलसह स्टेअरिंग माउंटेड कंट्रोलही मिळेल. त्यात सेंट्रल कन्सोलमध्ये एक रोटरी नाॅब असेल. त्याचा वापर कारचे मोड बदलण्यासाठी केला जाईल. नवीन स्काॅर्पिओत ९ इंचाचे टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम दिले जाऊ शकते. जे अॅपल कार प्ले आणि अँड्राॅईड ऑटोला सपोर्ट करेल. दुसरीकडे स्काॅर्पिओत ३६० डिग्री पार्किंग कॅमेरा मिळेल. त्याच्या मदतीने एसयूव्हीला कमी जागेत सहज पार्क केले जाऊ शकेल. सुरक्षेच्या फिचर्सविषयी बोलाल, तर स्काॅर्पिओत ६ एअर बॅग्स, ट्रॅक्शन कंट्रोल, स्टॅबिलिटी कंट्रोल, अँटी लाॅक ब्रेकिंग सिस्टिम, ISOFIX चाईल्ड सीट माऊंटचे फिचर मिळेल. नवीन स्काॅर्पिओत महिंद्रा थार प्रमाणेच स्टँडर्ड चार बाय चार फिचर दिले जाऊ शकते. स्काॅर्पिओत अनेक टेरॅन मोड्स मिळेल. टेरॅन मोड्सच्या माध्यमातून चार बाय चार फिचरचा वापर केला जाऊ शकतो. दुसरीकडे टाॅर्कला ही टेरॅननुसार डिस्ट्रीब्यूट केले जाऊ शकते. या व्यतिरिक्त नवीन २०२२ स्काॅर्पिओत ट्विन पाॅड एलईडी हेडलॅम्प्ससह प्रोजेक्टर लॅम्प्स मिळेल. रिअरमध्ये एलईजी टेल लॅम्प्स असेल, त्यात सिक्वेन्शियल टर्न इंडीकेटर्स मिळेल.
इंजिन
नवीन महिंद्रा स्काॅर्पिओत (Mahindra Scorpio) २.० लीटर पेट्रोल इंजिन आणि २.२ लीटर डिझेल इंजिनचे विकल्प मिळेल. जे पूर्वीच XIV700 मध्ये ऑफर दिले जाऊ शकतो. वृत्तांनुसार स्काॅर्पिओच्या खाली व्हेरिएंटमध्ये १३० बीएचपीची कमाल पाॅवर दिले जाऊ शकते. जे थारमध्ये ही दिले जाते. दुसरीकडे ३० एनएमचे टाॅर्क आऊटपुट आणि ६ स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनचे फिचर मिळू शकतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.