Mahindra लवकरच लाँच करु शकते नवी इलेक्ट्रिक SUV कार

महिंद्राची येणार नवीन इलेक्ट्रीक एसयूव्ही कार
Mahindra Electric SUV Car To Be Launch Soon
Mahindra Electric SUV Car To Be Launch Soonesakal
Updated on

नवी दिल्ली : भारतात इलेक्ट्रिक वाहनांची वाढती मागणी आणि भविष्याचा विचार करता सर्व वाहन उत्पादक कंपन्या आपापली इलेक्ट्रिक वाहने (Electric Vehicle) बाजारात लाँच करित आहेत. यात देशातील वाहन उत्पादक कंपनी महिंद्रा लवकरच आपली नवीन इलेक्ट्रिक कार सादर करणार आहे. महिंद्रा लवकरच ती भारतीय बाजारातील लाँचिंगची घोषणा करु शकते. वेगवेगळ्या वृत्तांनुसार, महिंद्रा आपली eXUV300 SUV ला नवीन नाव देणार आहे. तिला आता XUV400 या नावाने ओळखले जाईल. याबाबतीत महिंद्रा समुहाचे (Mahindra Group) ऑटो आणि फार्म सेक्टरचे कार्यकारी संचालक राजेश जेजुरीकर म्हणतात, कंपनी XUV300 च्या इलेक्ट्रिक व्हर्जनला नवीन नाव देण्यासाठी XUV400 माॅनीकर वापरात आणू शकते. मात्र आतापर्यंत हे नाव अंतिम केलेले नाही. eXUV 300 SUV ला दुसऱ्या एसयूव्हीच्या तुलनेत मोठे केबिन बनवले जात आहे. ते तिचे यूएसपी ठरु शकते. चार्जिंग सोपे व्हावे यासाठी चार्जिंग पोर्टला रिअर साईडऐवजी तिच्या फ्रंटमध्ये दिले गेले आहे.

Mahindra Electric SUV Car To Be Launch Soon
Hero Motocorpची हटके एक्सप्लस 200 4व्ही भारतीय बाजारात दाखल

माध्यमांच्या वृत्तांनुसार कंपनी या इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्येही महिंद्रा एक्सयूव्ही ७०० प्रमाणे हायटेक फिचर्स देऊ शकते. या ईएक्सयूव्ही ३०० एसयूव्हीच्या फिचर्सविषयी बोलाल तर वृत्तांनुसार यात अँड्राॅईड आणि अॅपल कार प्लेची कनेक्टिव्हिटीवाला १०.२५ इंचाचे टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिमसह ड्युअल जोन क्लायमेट कंट्रोल, पॅनोरॅमिक सनरुम सारखे फिचर्स दिले जाऊ शकते. या एसयूव्हीमध्ये ड्रायव्हिंग आणि रेंजमध्ये कंपनी तिला तीन ड्रायव्हिंग मोडसह दोन बॅटरी व्हेरियंटचा पर्याय सादर करु शकते. महिंद्राने ईएक्सयूव्ही३०० ला अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करत तिला इलेक्ट्रिक स्केलेबल आणि माॅड्यूलर ऑर्किटेक्चर प्लॅटफाॅर्मवर तयार केले आहे. या एसयूव्हीमध्ये ३५० व्हीचे बॅटरी देण्यात आली आहे. जिला दोन व्हेरिएंटसाथ सादर केले जाऊ शकते. याबरोबरच इलेक्ट्रिक एसयूव्ही महिंद्राचे पहिले प्राॅडक्ट जे एलजी केमद्वारा स्पेशल तयार बॅटरी सेलचा वापर केला जाईल. या इलेक्ट्रिक एसयूव्हीच्या किंमतीवरुन महिंद्राने आतापर्यंत कोणतीही घोषणा केलेली नाही. मात्र तज्ज्ञांनुसार कंपनी ही कार १५ लाख रुपयांच्या सुरुवाती किंमतीपासून लाँच करु शकते. लाँच झाल्यानंतर या इलेक्ट्रिक एसयूव्हीचा सामना टाटा नेक्सन ईव्ही, एमजी जेडएस ईव्ही आणि ह्युंदाई कोना आदींशी असे मानले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.