Mahindra Electric XUV300 : महिंद्राच्या इलेक्ट्रिक कारची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. कंपनी आपल्या एक्सयूव्ही 300 एसयूव्हीचे (SUV) इलेक्ट्रिक व्हेरियंट लॉन्च करणार असल्याचं महिंद्रानं स्पष्ट केलं आहे. पुढील वर्षाच्या पहिल्या तिमाहीत महिंद्रा XUV300 इलेक्ट्रीक कार लॉन्च केली जाईल. कंपनीचे कार्यकारी संचालक राजेश जेजुरीकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. महिंद्रा एक्सयूव्ही 300 आधीच ICE प्रकारात उपलब्ध आहे. महिंद्रा XUV300 इलेक्ट्रिक आता एमजी (MG) आणि टाटा मोटर्सशी (Tata Motors) स्पर्धा करेल. कंपनीच्या XUV700 आणि थार या दोन मॉडेलच्या तुलनेत महिंद्राची XUV300 ही सर्वात जास्त विक्री होणारी आयसीई एसयूव्ही (ICE SUV) आहे.
टाटाच्या इलेक्ट्रीक कारशी असेल स्पर्धा-
जेजुरीकर म्हणाले की इलेक्ट्रिक XUV300 4 मीटर वरील श्रेणीतील असेल. याचा अर्थ या कारवर EV इन्सेटीव्ह मिळू शकत नाही. विविध राज्यं आणि केंद्र सरकार इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीवर अनुदान देतात. महिंद्रा इलेक्ट्रीक कार सेगमेंटमध्येही नाव कमावेल, अशी कंपनीला अपेक्षा आशा आहे. महिंद्राने नुकतेच मॉड्युलर इलेक्ट्रिक ड्राईव्ह मॅट्रिक्सवर काम करण्यासाठी फॉक्सवॅगन समूहासोबत करार केला आहे. सब-फोर मीटर ईव्ही श्रेणीतील टाटा मोटर्सचे वर्चस्व मोडीत काढण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. टाटाकडे सध्या Nexon आणि Tigor EV आहेत.
महिंद्राची XUV रेंज आहे लोकप्रिय-
महिंद्राच्या XUV रेंजमध्ये, XUV300 आणि XUV700 या दोन्ही SUV सेगमेंटमध्ये विक्रमी वाढ होत आहे. इलेक्ट्रीक कार घेऊ पाहणाऱ्या ग्राहकांना आता आणखी एक दमदार भारतीय ब्रँड उपलब्ध असणार आहे. मारुती सुझुकीने अद्याप ईव्ही सेगमेंटमध्ये उतरण्याची अधिकृत घोषणा केली नाही. सध्या Tata Motors आणि Mahindra & Mahindra या भारतीय कंपन्या ह्युंदाई आणि MG या विदेशी ब्रँडशी स्पर्धा करत आहेत.
2026 पर्यंत 9 नवीन मॉडेल्स -
महिंद्राने EV संदर्भात आपल्या भविष्यातील योजनांची माहितीही दिली आहे. महिंद्राने 2026 पर्यंत नऊ नवीन मॉडेल्स बाजारात आणण्याची घोषणा केली आहे. कंपनीने पुढे सांगितले की ते त्यांच्या बॅटरी इलेक्ट्रिक व्हेईकल (BEV) रेंजचे 15 ऑगस्ट 2022 रोजी म्हणजेच स्वातंत्र्यदिनी अनावरण करतील. कंपनीने असेही सांगितले की, हे इलेक्ट्रिक मॉडेल 4.2-मीटर लांब असेल. परंतु XUV300 ची लांबी 4 मीटरपेक्षा कमी आहे. Mahindra eXUV300ला चाचणी दरम्यान अनेक वेळा स्पॉट केले गेले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.