ISRO Mangalyaan 2 : 'मंगळयान-2' मोहीम असणार अगदी अनोखी; लँडर-रोव्हरसोबत ड्रोनही पाठवणार इस्रो? रिपोर्टमध्ये दावा

ISRO Mars Mission : मंगळ ग्रहावर सध्या अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाचा इनजेन्युइटी हा ड्रोन उपस्थित आहे. या ड्रोनने नुकताच आपला तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला.
ISRO Mangalyaan-2 Drone
ISRO Mangalyaan-2 DroneeSakal
Updated on

ISRO Mangalyaan-2 Mission Update : भारताची अंतराळ संशोधन संस्था इस्रो सध्या एकापाठोपाठ एक यशस्वी मोहिमा राबवत आहे. काही दिवसांपूर्वीच हवामान उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केल्यानंतर आता इस्रो पुढील मोहिमांच्या तयारीला लागलं आहे. यातच मंगळयान-2 मोहिमेची तयारी देखील बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे. आता या मिशनबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

पहिल्या मंगळयान (ISRO MOM) मोहिमेत भारताने मंगळ ग्रहाचं निरीक्षण करण्यासाठी एक उपग्रह लाँच केला होता. भारताने पहिल्याच प्रयत्नात ही मोहीम यशस्वीपणे पार पाडली होती. यानंतर आता पुढील मंगळयान मोहिमेत भारत या ग्रहावर चक्क एक लँडर, रोव्हर आणि ड्रोनही पाठवणार असल्याचं म्हटलं जात आहे. (Martian Drone)

कित्येक मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे, की इस्रो यावेळी मंगळावर एक ड्रोन किंवा रोटोकॉप्टर (Mars Rotocopter) पाठवेल. 'चांद्रयान-3'च्या माध्यमातून चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करुन दाखवल्यामुळे इस्रोच्या वैज्ञानिकांना हुरूप आला आहे. मंगळयान-2 मोहिमेच्या माध्यमातून मंगळ ग्रहावर देखील सॉफ्ट लँडिंग करण्याची इस्रोची आधीपासूनच योजना होती. मात्र, सोबतच ड्रोनही पाठवल्यामुळे मंगळ ग्रहाचा अभूतपूर्व असा अभ्यास आपल्याला करता येणार आहे. (Mars Helicopter)

ISRO Mangalyaan-2 Drone
ISRO Gaganyaan Mission : पुढील वर्षी इस्रो अवकाशात पाठवणार अंतराळवीर; यावर्षी होणार 'गगनयान' मोहिमेच्या महत्त्वाच्या चाचण्या

नासाचा ड्रोन उपस्थित

मंगळ ग्रहावर सध्या अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाचा इनजेन्युइटी (NASA Ingenuity Quadcopter) हा ड्रोन उपस्थित आहे. या ड्रोनने नुकताच आपला तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. या तीन वर्षांमध्ये त्याने एकूण 72 उड्डाणे पार पाडली.

इस्रोचा ड्रोन हा सध्या कन्सेप्चुअल स्टेजमध्ये असल्याचं म्हटलं जात आहे. तयार झाल्यानंतर हा ड्रोन मंगळावरील वातावरणात सुमारे 100 मीटर उंचीवर उडू शकेल. या ड्रोनमध्ये असलेल्या पेलोडच्या मदतीने मंगळाच्या पृष्ठभागाचा अभ्यास करता येईल. यामध्ये मार्शिअन बाऊंड्री लेयर एक्स्प्लोरर (Marble) हा पेलोड असेल असंही सांगण्यात येत आहे. (ISRO Mars Drone)

इस्रोची ही मोहीम (Mangalyaan-2) यशस्वी झाल्यास भारत मंगळ ग्रहाचा अनोख्या पद्धतीने अभ्यास करू शकणार आहे. एकाच वेळी इस्रोचा लँडर, रोव्हर आणि ड्रोन मंगळावर विविध प्रकारचे प्रयोग करेल, आणि त्यातून मिळणारी माहिती ही संपूर्ण जगासाठी फायद्याची ठरणार आहे. मंगळयान-2 मोहिमेत ड्रोनच्या वापराबाबत इस्रोकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

ISRO Mangalyaan-2 Drone
India Spy Satellite : भारताचा पहिला खासगी हेरगिरी उपग्रह लाँचसाठी सज्ज; 'टाटा'ने केली निर्मिती, 'स्पेस-एक्स' करणार प्रक्षेपण - रिपोर्ट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.