Inverter Battery Care- इर्न्व्हटरच्या बॅटरीत नेमकं किती पाणी भरायचं असा प्रश्न तुम्हालाही पडतो का?

इर्न्व्हटरमध्ये योग्यवेळी आणि योग्य प्रमाणात पाणी भरणं, तसचं पाणी बदलणं गरजेचं आहे. इर्न्व्हटरमध्ये योग्य वेळी पाणी भरून तुम्ही इलेक्ट्रोलाइट्स पातळी वाढवून इर्न्व्हटरची लाइफ वाढवू शकता
इन्व्हर्टर बॅटरीची काळजी
इन्व्हर्टर बॅटरीची काळजीEsakal
Updated on

लाइट गेली तर गोंधळ नको म्हणून अनेकांच्या घरी किंवा दुकानामध्ये इर्न्व्हटर Inverter बसवण्यास येतो. यामुळे पावसाळा असो किंवा उन्हाळा, दिवस असो किंवा रात्र लाइट गेली तरी कोणतीही कामं अडत नाहीत. इर्न्व्हटरच्या मदतीने तुम्ही काही तास घर किंवा दुकानामधील उपकरणं सुरु ठेवू शकता. Marathi Smarts Tips How to take care of inverter battery

मात्र इर्न्व्हटरचं बिघडला तर मोठा गोंधळ होवू शकतो. यासाठीच इर्न्व्हटरची योग्य काळजी घेणं गरजेचं आहे. बॅटरी Battery हा इर्न्व्हटरचा एक महत्वाचा भाग आहे. यामुळेच इर्न्व्हटरच्या बॅटरीची काळजी घेणं तिची वरचेवर देखभाल करणं आवश्यक आहे.

इर्न्व्हटरमध्ये Inverter योग्यवेळी आणि योग्य प्रमाणात पाणी भरणं, तसचं पाणी बदलणं गरजेचं आहे. इर्न्व्हटरमध्ये योग्य वेळी पाणी भरून तुम्ही इलेक्ट्रोलाइट्स पातळी वाढवून इर्न्व्हटरची लाइफ वाढवू शकता.

इर्न्व्हटरच्या बॅटरीमध्ये पाण्याची गरज असते. ज्यामुळे तापमान नियंत्रणात राखण्यास मदत होते. मात्र अनेकांना इर्न्व्हटरमध्ये किती प्रमाणात पाणी भरावं आणि ते नेमतं केव्हा भरावं अशा अनेक गोष्टींची कल्पना नसते. अपुऱ्या माहितीमुळे बॅटरी खराब होवू शकते आणि याचा इर्न्व्हटरच्या कार्यप्रणालीवरही परिणाम होवू शकतो.

इर्न्व्हटरची बॅटरी बदलण्यासाठी विविध कंपन्यांच्या वेगवेगळ्या सूचना असतात. मात्र सामान्यत: काही गोष्टींकडे लक्ष दिल्यास बॅटरी नेमकी कधी बदलायची आहे हे तुमच्या लक्षात येऊ शकतं.

हे देखिल वाचा-

इन्व्हर्टर बॅटरीची काळजी
गॅजेटमधील खराब झालेली बॅटरी पुन्हा वापरणे शक्य, मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी लावला नवा शोध

इंडिकेटर लाइन्सकडे लक्ष द्या- अनेक इर्न्व्हटरच्या बॅटरीमध्ये बॅटरीच्या वरील बाजुला किंवा समोर काही इंडिकेटर लाइन्स असतात. या लाइन बॅटरीमध्ये किती पाणी भरावं हे दर्शवण्यासाठीच असतात. तसंच काही वेळा इर्न्व्हटरसोबत मिळालेल्या म्ययुअलमध्ये देखील ही माहीत देण्यात आलेली असते. ही सर्व माहिती वाचूनच बॅटरीमध्ये पाणी भरा.

डिस्टिल वॉटर- बॅटरीसाठी कायम डिस्टिल किंवा डिमिनरलाइज्ड पाण्याचा वापर करण्यात यावा. हे पाणी उकळत्या पाण्याच्या वाफेपासून तयार करण्यात येतं. यात कोणत्याही प्रकारची अशुद्धता नसते. अनेकजण नळाचं किंवा साठवलेल्या पाण्याचा बॅटरीसाठी वापर करतात. यामुळे बॅटरी लवकर खराब होवू शकते.

स्वाइंग हायड्रोमीटरचा वापर करा- स्वाइंग हायड्रोमीटरमुळे बॅटरीतील अॅसिडच्या पातळीचं प्रमाण मोजण्यास मदत होते. यामुळे तुम्हाला बॅटरीमध्ये योग्य प्रमाणात पाणी भरण्याचा अंदाज येतो.

कंपनीच्या सुचनांचं पालन करा- बॅटरीची निर्मिती करण्यात आलेल्या कंपनीकडून देण्यात आलेल्या सुचनांप्रमाणेच बॅटरीत पाणी भरा. अनेकदा इतर वापरकर्ते काही सल्ले देतात. मात्र प्रत्येक कंपनीच्या बॅटरीमध्ये काही फरक असू शकतो. त्यामुळे तुम्ही वापरत असलेल्या बॅटरी निर्मात्याकडून देण्यात आलेल्या सुचनांचच पालन करा.

बॅटरीमध्ये साधारण २-३ महिन्यात पाणी बदलण्याची वेळ येते त्यामुळे दर २-३ महिन्यांच्या अंतराने बॅटरीवरील इंडेकेर्टस तपासा. बॅटरीत योग्य वेळी पाणी भरल्याने बॅटरीचे लाईफ तर वाढेलच शिवाय तिची कार्यक्षमता देखील टिकून राहण्यास मदत होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()