Mark Zuckerberg Surgery : मार्क झुकरबर्गवर नुकतीच एक मोठी शस्त्रक्रिया पार पडली आहे. मिक्स्ड मार्शल आर्ट (MMA) फाईटसाठी तयारी करत असताना पायाची नस फाटल्यामुळे (ACL) त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले होते. मार्कने स्वतःच आपला रुग्णालयातील फोटो शेअर करत याबाबत माहिती दिली आहे.
मार्कने आपल्या इन्स्टाग्राम आणि फेसबुक अकाउंटवरुन याबाबत माहिती दिली. "प्रॅक्टिस करताना माझ्या पायाची नस फाटल्यामुळे माझ्यावर शस्त्रक्रिया पार पडली. सर्जरीनंतर लिगामेंट बदलण्यात आली आहे. सर्व डॉक्टरांचे आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे आभार." असं मार्कने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
"मी पुढील वर्षाच्या सुरुवातीला होणाऱ्या MMA फाईटसाठी ट्रेनिंग घेत होतो. मात्र, आता ही फाईट पुढे ढकलावी लागणार आहे. अर्थात, पूर्णपणे बरा झाल्यानंतर नक्कीच मी यात सहभागी होईल. तुम्ही सर्वांनी दिलेल्या प्रेम आणि आधारासाठी धन्यवाद." असंही मार्क झुकरबर्गने आपल्या पोस्टमध्ये स्पष्ट केलं आहे. (Tech News)
कित्येक यूजर्सनी मार्कला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच यासाठी बरेच प्रार्थना देखील करत आहेत. झुकरबर्गने कोरोना महामारीच्या काळात MMA आणि ब्राझिलियन जुजुत्सुची ट्रेनिंग घेण्यास सुरुवात केली होती. यावर्षी मे महिन्यात त्याने पहिल्या टूर्नामेंटमध्ये सहभाग नोंदवला होता.
दरम्यान ट्विटरचे मालक इलॉन मस्क आणि मार्क झुकरबर्ग यांच्यातील बॉक्सिंग फाईटची चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू होती. मस्कने मजेत मार्कला फाईटचं चॅलेंज दिलं होतं. मात्र, त्यानंतर मार्कने हे चॅलेंज स्वीकारल्यामुळे या दोघांमध्ये खरोखरच फाईट होणार असं दिसत होतं. यासाठी दोघांनीही प्रोफेशनल बॉक्सर्सकडून ट्रेनिंग देखील घेतली होती. मात्र, त्यानंतर दोन्ही बाजूंनी वेळ आणि जागा निश्चित होत नसल्यामुळे ही फाईट रद्द झाली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.