Smartphone Alert : अलर्ट! मोबाईल तुमच्या गप्पा ऐकतंय; या बड्या कंपनीने दिले पुरावे,यामागे ॲमेझॉन-फेसबुकचा हात?

Users data at risk as phones listen in secretly : एक मोठ्या मार्केटिंग कंपनीने अखेर कबूल केलं आहे की स्मार्टफोनमध्ये वापरकर्तांच्या गप्पा ऐकण्यासाठी सॉफ्टवेअर असतं. याचा अर्थ असा की आपण कुणाशीही बोलत असलो तरी मोबाईल तुमच्या गप्पा ऐकत असतो.
Users data at risk as phones listen in secretly
Users data at risk as phones listen in secretlyesakal
Updated on

Users data risk : स्मार्टफोन हा आपल्या जीवनातला सोबती बनला आहे अगदी फोन कॉलपासून पेमेंट करण्यापर्यंत एक मिनी बँक म्हणून ते काम करत आहे फक्त संवाद साधनेस नाही तर शॉपिंग वेगवेगळी माहिती मिळवणे आणि बऱ्याच कामांसाठी मोबाईल फोनचा उपयोग होतो. दैनंदिन जीवनात कामी येणाऱ्या या स्मार्टफोन बद्दल आपल्याला एक शंका होती.वर्षानुवर्षे लोकांना वाटतं होतं आपलं फोन आपल्या गप्पा ऐकतंय पण पुरावा नव्हता ना? तर आता तो मिळाला आहे.

एक मोठ्या मार्केटिंग कंपनीने अखेर कबूल केलं आहे की स्मार्टफोनमध्ये वापरकर्तांच्या गप्पा ऐकण्यासाठी सॉफ्टवेअर असतं. याचा अर्थ असा की आपण आपल्या आईशी कॉफी मेकर घेण्याबद्दल बोलत असाल तर तुमचं फोनही ते ऐकतंय आणि मग अचानक तुमच्या फोनवर कॉफी मेकर विकणाऱ्या जाहिराती येतात. तुम्ही तुमच्या मित्रांशी किंवा मैत्रिणींशी कपडे खरेदी करण्याबद्दल गप्पा मारत असाल तर लगेच तुम्हाला ट्रेंडमध्ये असलेल्या कपड्यांच्या जाहिराती दिसेल लागतील. आता कारण तुम्हाला कळेल की ते तुम्ही गुगल केलं नाही तर तुमच्या फोनने ऐकलेल्या गप्पांवरुन आलंय.

Users data at risk as phones listen in secretly
Samsung Smartphone Launch : चक्क १० हजार किंमतीत सॅमसंगचा ब्रँड मोबाईल; लाँच झाल्यावर लगेच आऊट ऑफ स्टॉक? नेमकं काय आहे खास,बघाच

404 मिडिया या रिपोर्टनुसार, ही कंपनी ग्राहकांच्या संभाषणांवरुन त्यांच्या खरेदीच्या हेतूचा अंदाज घेण्यासाठी AI वापरते. यामुळे जाहिरातदारांना अचूक टार्गेटेड जाहिराती दाखवता येतात.

या बातमीमुळे जगभरात सगळे आश्चर्यचकित झाले आहेत. फेसबुक आणि अमेझॉन यासारख्या मोठ्या कंपन्यांशी यांचे संबंध असल्याने त्यांनीही या प्रकरणात पाऊल उचलली आहेत. फेसबुक वापरकर्त्यांची माहिती बेकायदेशीरपणे वापरली जात नाहीये याची खात्री करण्यासाठी त्यांच्या सेवांच्या अटींची चौकशी करत आहे. दुसरीकडे, अमेझॉनने या प्रकरणाशी कोणताही संबंध नाही असल्याचं स्पष्ट केलं आहे आणि अशा एजन्सींबरोबर काम करण्यास नकार दिला आहे.

Users data at risk as phones listen in secretly
Whatsapp Safety Tips : व्हॉट्सअ‍ॅप वापरताना होणाऱ्या 'या' लहानश्या चुका,तुम्हाला अडकवू शकतात हॅकिंगच्या जाळ्यात

एका मार्केटिंग कंपनीच्या म्हणण्यानुसार, वापरकर्ते अॅप डाउनलोड करताना अँक्टिव्ह लिसनिंग टेकशी सहमत होतात. ते म्हणतात की "वापराकर्ते अॅप डाउनलोड करताना किंवा अपडेट करताना वापराच्या अटी मान्य करतात त्यात अँक्टिव्ह लिसनिंग बद्दल माहिती असते पण ती कोणी वाचत नाही."

हे धक्कादायक प्रकरण आपल्या सर्वांना आपल्या फोनमधील परमिशन आणि वापराच्या अटींकडे अधिक लक्ष देण्याची गरज अधोरेखित करते. शेवटी आपल्या गोपनीयतेची आपणच जबाबदारी घेणं आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.