Smiley Face on Mars : मंगळ ग्रहावर सापडलेल्या 'स्मायली फेस'चं रहस्य काय? शास्त्रज्ञांनी घेतला मनुष्य जीवनाच्या खुणांचा शोध

european space agency shares smiley face salt deposit found on mars : युरोपियन स्पेस एजन्सीच्या (ESA) एक्सोमार्स ट्रेस गॅस ऑर्बिटरने मंगळ ग्रहावर 'स्मायली फेस'सारखा आकार असलेल्या मिठाच्या साठ्याचे चित्र शेअर केले आहे. सध्या सोशल मिडियावर या फोटोची खूप चर्चा सुरू आहे.
european space agency shares smiley face salt deposit found on mars
european space agency shares smiley face salt deposit found on marsesakal
Updated on

Smiley Face on Mars : युरोपियन स्पेस एजन्सीच्या (ESA) एक्सोमार्स ट्रेस गॅस ऑर्बिटरने मंगळ ग्रहावर 'स्मायली फेस'सारखा आकार असलेल्या मिठाच्या साठ्याचे चित्र शेअर केले आहे. सध्या सोशल मिडियावर या फोटोची खूप चर्चा सुरू आहे. मंगळवरच्या या हसत्या चेहऱ्याचे रहस्य काय हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

या शोधामुळे शास्त्रज्ञांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे, कारण त्यांना असे वाटते की या मिठाच्या साठ्यात मंगळाच्या शेवटच्या शिल्लक जीवसृष्टीच्या खुणा दडलेल्या असू शकतात. अब्जावधी वर्षांपूर्वी मंगळावर मोठ्या नद्या, तलाव आणि समुद्र होते, जे एका महाकाय थंडीमुळे नष्ट झाले. आता संशोधकांचा असा विश्वास आहे की या स्मायली फेसच्या आकारातील मिठाच्या साठ्यात जीवाणूंच्या अस्तित्वाच्या खुणा असू शकतात, ज्यामुळे मंगळावर कधी तरी जीवसृष्टी अस्तित्वात होती याचा पुरावा मिळू शकतो.

european space agency shares smiley face salt deposit found on mars
Boeing Starliner : सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोरविनाच ‘स्टारलायनर’ न्यू मेक्सिकोतील ‘व्हाइट सँड’वर उतरले!

या मिठाच्या साठ्यांचा अभ्यास करून शास्त्रज्ञांना मंगळाच्या भूतकाळातील हवामान, भूविज्ञान आणि तेथे जीवन असण्याच्या शक्यतांबद्दल महत्त्वपूर्ण माहिती मिळू शकते. मिठाचे साठे हे प्राचीन पाण्याचे अवशेष असल्याचे संकेत देत असून ते मंगळावर लाखो वर्षांपूर्वीचे रहिवासी क्षेत्र दर्शवू शकतात. मंगळाने त्याचे चुंबकीय क्षेत्र गमावल्यामुळे वातावरण टिकवून ठेवण्याची क्षमता गमावली आणि त्यामुळे पाणी वाफ होऊन गायब झाले किंवा गोठले.

european space agency shares smiley face salt deposit found on mars
NASA-ISRO ISS Mission: नासा आणि इस्रोचे अंतराळ मिशन; पण चर्चा फक्त ग्रुप कॅप्टनचीच, कोण आहेत गगनयात्री शुभांशु शुक्ला?

संशोधकांचा असा प्रस्ताव आहे की हा इमोटिकॉनच्या आकाराचा मीठ साठा कठोर सूक्ष्मजीव साठवू शकतो. युरोपियन स्पेस एजन्सीच्या एक्सोमार्स ट्रेस गॅस ऑर्बिटरने मंगळाच्या कोरड्या पृष्ठभागावरील क्लोराईड मीठ साठ्याचे आश्चर्यकारक प्रतिमांचा संग्रह केला आहे.

ESAने हे छायाचित्र सोशल मीडियावर शेअर केल्यापासून हजारो लोकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक जणांनी या छायाचित्राचे कौतुक केले असून, काहींनी या मिठाच्या साठ्यांच्या आकारावर गंमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.