Maruti Brezza ने मारली बाजी, सर्वाधिक विकली जाणारी SUV ठरली

भारतात सब-काॅम्पॅक्ट ४ मीटर एसयूव्ही सेगमेंटमध्ये मारुती सुझुकीने सर्वांना मागे टाकले आहे.
Maruti Brezza
Maruti Brezzaesakal
Updated on

नवी दिल्ली : भारतात सब-काॅम्पॅक्ट ४ मीटर एसयूव्ही (Sub-Compact 4 Meter SUV) सेगमेंटमध्ये मारुती सुझुकीने (Maruti Suzuki) सर्वांना मागे टाकले आहे. नोव्हेंबर २०२१ मध्ये या सेगमेंटमध्ये सर्वात जास्त मारुती सुझुकी ब्रेझाची (Maruti Brezza) विक्री झाली आहे. काॅम्पॅक्ट एसयूव्हीमध्ये मारुती ब्रेझाची स्पर्धा टाटा नेक्साॅन (Tata Nexon), ह्युंदाई व्हेन्यू (Hyundai Venue), किया साॅनेट (Kia Sonet) आणि निसान मॅन्नाईट आदींशी आहे. मात्र मारुती सुझुकी विटारा ब्रेझा नोव्हेंबर महिन्यात ग्राहकांची पहिली पसंत राहिली.

विक्रीत ३७.२८ टक्क्यांनी वाढ

वास्तविक नोव्हेंबर २०२१ मध्ये ब्रेझाची एकूण १० हजार ७६० युनिट्स इतकी विक्री झाली. मात्र सरासरीच्या तुलनेत ब्रेझाची विक्री ३७.२८ टक्क्यांनी वाढली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ब्रेझाची एकूण ७ हजार ८३८ युनिट्सची विक्री झाली होती. दुसरीकडे प्रत्येक महिन्याच्या आधारावर विक्री ३३.९६ टक्क्यांनी वाढली आहे. ऑक्टोबर २०२१ मध्ये एकूण ८०३२ ब्रेझा विकल्या गेल्या होत्या. चार मीटर एसयूव्ही सेगमेंटमध्ये दुसऱ्या क्रमांकावर टाटा नेक्साॅनचे वर्चस्व राहिले. नोव्हेंबर २०२१ मध्ये नेक्साॅनची एकूण ९ हजार ८३१ युनिट्स विक्री झाली. दुसरीकडे गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ६ हजार २१ युनिट्स विक्री झाली. मात्र ऑक्टोबरच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये नेक्साॅनची विक्री घटली आहे.

Maruti Brezza
सिंगल चार्जमध्ये १०० किमी धावणारी Roadlark Electric सायकल

जानेवारीपासून मारुतीच्या कार्स महागणार

मारुती सुझुकी ब्रेझाच्या ऑटोमॅटिक व्हर्जनमध्ये माईल्ड-हायब्रीड सिस्टिम मिळते. त्याने इंधनची बचत होते. सध्या ब्रेझाची दिल्लीत एक्स-शोरुम किंमत ७.६१ लाख ते ११.१९ लाखांच्या दरम्यान आहे. दुसरीकडे १ जानेवारीपासून मारुती सुझुकी ब्रेझाची किंमत वाढू शकते. मारुतीने १ जानेवारीपासून कार्सच्या किंमतींमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीचे म्हणणे आहे, की उत्पादन खर्चात वाढीमुळे किंमत वाढ केल्याशिवाय पर्याय नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.