Maruti Cars Waiting Period : मारुती सुझुकीचे 3 लाख 80 हजारांहून अधिक बुकिंग पेंडींग

देशातील आघाडीची कार उत्पादक कंपनी असलेल्या मारुती सुझुकी इंडियावर सध्या बुकिंगचा मोठा दबाव
Maruti Cars Waiting Period
Maruti Cars Waiting Periodesakal
Updated on

Maruti Cars Waiting Period : देशातील आघाडीची कार उत्पादक कंपनी असलेल्या मारुती सुझुकी इंडियावर सध्या बुकिंगचा मोठा दबाव आहे. कंपनीकडे सध्या Ertiga, Dzire, Grand Vitara, Jimny, Baleno, Franks आणि XL6 सारख्या कारसाठी जवळपास 380,000 बुकिंग पेंडींग आहेत.

Maruti Cars Waiting Period
Car Insurance : गाडीचा Insurance काढताय? या 3 गोष्टींकडे लक्ष द्या, नाहीतर होईल नुकसान

कंपनीकडे भारतात सर्वाधिक विक्री होणारी MPV कार मारुती एर्टिगा साठी सुमारे 100,000 बुकिंग पेंडिंग आहेत. यानंतर, मारुतीच्या कॉम्पॅक्ट सेडान कार डिझायरसाठी 40,000 बुकिंग आणि मध्यम आकाराच्या SUV मारुती ग्रँड विटारासाठी 34,000 बुकिंग कंपनीकडे पेंडिंग आहेत.

Maruti Cars Waiting Period
Upcoming Cars : एप्रिल मध्ये लॉन्च होणार या पाच जबरदस्त कार्स

या गाड्यांनाही जोरदार मागणी

मारुती सुझुकी पुढील महिन्यात आपली 5 डोअर लाइफस्टाइल SUV जिमनी SUV लाँच करणार आहे. पण कंपनीला यासाठी 24,500 हून अधिक बुकिंग आधीच मिळालेत. यासोबतच मारुती या महिन्यात कूप SUV Maruti Suzuki Fronx लाँच करणार आहे, ज्यासाठी कंपनीला आतापर्यंत 16,500 हून अधिक बुकिंग मिळाले आहेत.

Maruti Cars Waiting Period
Tesla Car : टेस्लामधील त्रुटींमुळे कार हॅक होण्याची शक्यता

तसेच, कंपनीकडे प्रिमियम हॅचबॅक बलेनो या सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारसाठी 20,000 पेक्षा जास्त बुकिंग पेंडिंग आहेत. त्याच वेळी, कंपनीकडे प्रीमियम MPV मारुती XL6 साठी 9,000 पेक्षा जास्त बुकिंग आहेत.

Maruti Cars Waiting Period
Budget Sunroof Cars : परवडणाऱ्या दरात घ्या सनरूफ कार

ग्राहकांना किती वाट पाहावी लागणार

मारुती कारसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात बुकिंग झाल्यामुळे ग्राहकांना डिलिव्हरीसाठीही बराच वेळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. सध्या, मारुती एर्टिगासाठी सर्वाधिक प्रतीक्षा कालावधी 33-34 आठवडे आहे. त्याचवेळी, मारुती सुझुकी ब्रेझाच्या डिलिव्हरीसाठी ग्राहकांना 21-22 आठवडे प्रतीक्षा करावी लागेल. मारुती सुझुकी डिझायर बद्दल बोलायचं तर, मारुती सुझुकी ग्रँड विटारा साठी 20-21 आठवडे, 16-17 आठवडे आणि XL6 ला 14-15 आठवडे लागतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.