मारुती उद्या लॉंच करणार सर्वाधिक मायलेज असलेली 'ही' नवीन SUV, वाचा डिटेल्स

maruti grand vitara launch tomorrow check expected price and details here
maruti grand vitara launch tomorrow check expected price and details here
Updated on

मारुती सुझुकी आपली मध्यम आकाराची SUV Grand Vitara उद्या भारतात लॉन्च करणार आहे. SUV ला माइल्ड हायब्रिड आणि स्ट्रॉंग हायब्रिड पॉवरट्रेन पर्याय मिळतील. टोयोटा आणि सुझुकी हे वाहन संयुक्तपणे टोयोटाच्या कर्नाटकातील कारखान्यात बनवत आहेत. मारुती सुझुकी ग्रँड विटारा 11,000 रुपयांमध्ये बुक करता येणार आहे. तसेच ऑक्टोबरपासून या वाहनाची डिलिव्हरी सुरू होण्याची शक्यता आहे.

सेगमेंटमध्ये सर्वाधिक मायलेजचा दावा

मारुती सुझुकीचा दावा आहे की ही कार तिच्या सेगमेंटमध्ये सर्वाधिक 27.97 kmpl चा मायलेज देईल. ग्रँड विटारा लाँच केल्यानंतर त्याची स्पर्धा Hyundai Creta, Kia Seltos, Volkswagen Taigun, Skoda Kushak आणि Toyota High Rider यांच्याशी होईल. मारुती ग्रँड विटाराची किंमत रु. 10 लाख (एक्स-शोरूम) पेक्षा कमी असण्याची अपेक्षा आहे. तर टॉप-स्पेक स्ट्राँग हायब्रिड व्हेरियंटची किंमत 20 लाखांपेक्षा जास्त असू शकते (एक्स-शोरूम).

ग्रँड विटाराचे फीचर्स

मारुती सुझुकी ग्रँड विटारामध्ये पॅनोरामिक सनरूफ, हेड्स-अप डिस्प्ले, वायरलेस चार्जर, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 360-डिग्री पार्किंग कॅमेरा, अॅम्बियंट लाइटिंग, फ्रंट व्हेंटिलेटेड सीट्स, कीलेस एंट्री, रिअर एसी व्हेंट्स, इंजिन स्टार्ट/स्टॉपसाठी एक पुश बटण यांसारखी वैशिष्ट्ये आहेत. तसेच यूएसबी पोर्ट, 9-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, अँड्रॉइड ऑटो आणि Apple कारप्ले सपोर्ट देण्यात आला आहे.

maruti grand vitara launch tomorrow check expected price and details here
Splendor Plus : हीरोची स्प्लेंडर प्लस आली नव्या अवतारात, जाणून घ्या किंमत

ग्रँड विटारा इंजिन

मारुती सुझुकी आणि टोयोटा या दोन्ही कंपन्यांनी एकत्रितपणे हायरायडर आणि ग्रँड विटारा विकसित केले आहेत. हायरायडरप्रमाणे, ग्रँड विटारामध्ये माइल्ड-हायब्रीड पॉवरट्रेन आहे. हे 1462cc K15 इंजिन आहे जे 6,000 RPM वर सुमारे 100 bhp पॉवर आणि 4400 RPM वर 135 Nm टॉर्क जनरेट करते. याला माइल्ड-हायब्रिड सिस्टीम मिळते आणि ती 5-स्पीड मॅन्युअल किंवा 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिकशी जोडली जाते. ही पॉवरट्रेन आजपर्यंत AWD पर्याय असलेले एकमेव इंजिन आहे.

maruti grand vitara launch tomorrow check expected price and details here
OnePlus Nord Watch : येतेय वनप्लसची परवडणारी स्मार्टवॉच, जाणून घ्या किंमत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.