मारूती सुझुकीने अखेर आपली बहुप्रतिक्षित लाईफस्टाईल एसयूव्ही 'जिम्नी' (Maruti Jimny) लाँच केली आहे. या कारची बुकिंग पूर्वीच सुरू करण्यात आली होती. मात्र, आता अधिकृत लाँचनंतर जिम्नीची किंमत कंपनीने जाहीर केली आहे. या कारचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स यापूर्वीच जाहीर केले होते.
जिम्नीचं डिझाईन लोकांना भरपूर पसंत पडलं आहे. आतमध्ये मिनिमल इंटेरिअर देण्यात आलंय, जेणेकरून ड्रायव्हरचं लक्ष पूर्णपणे गाडी चालवण्यावर राहील. तसेच, गाडीच्या आतमध्ये प्रीमियम सराउंड साऊंड सिस्टीम देण्यात आली आहे. ऑफरोडिंग एक्सपिरीयंस चांगला होण्यासाठी यात फोर-व्हील ड्राईव्ह (4x4) ऑल ग्रिप प्रो सिस्टीम देण्यात आली आहे.
इंजिन
मारुतीची ही ऑफरोडिंग कार सहा व्हेरियंटमध्ये लाँच करण्यात आली आहे. यामध्ये 1.5 लीटर क्षमतेचं के-सीरीज नॅच्युरल अस्पायर्ड पेट्रोल इंजिन देण्यात आलंय. 5-स्पीड मॅन्युअल आणि 4-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन अशा दोन प्रकारात ही कार उपलब्ध असणार आहे.
मायलेज
मारुती जिम्नी या गाडीचं मायलेज सुमारे 16 ते 17 किलोमीटर प्रति लीटर एवढं आहे. या गाडीला 40 लीटरचा पेट्रोल टँक देण्यात आलाय. म्हणजेच पूर्ण टँक भरल्यानंतर ही गाडी सुमारे 650 किलोमीटर अंतर जाऊ शकेल.
किती आहे किंमत
थारचं मार्केट डाऊन करण्यासाठी जिम्नीची किंमत (Maruti Jimny Price) कमी ठेवण्यात येईल असा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करत होते. मात्र, असं काहीही झालेलं नाही. जिम्नीच्या बेस व्हेरियंटची किंमत 12.74 लाख रुपये असणार आहे. तर, टॉप व्हेरियंटची किंमत 15.05 लाख रुपयांपर्यंत जाऊ शकते.
जिम्नीच्या Zeta MT व्हेरियंटची किंमत 12.74 लाख रुपये आहे. Zeta AT व्हेरियंटची किंमत 13.94 लाख रुपये आहे. Alpha MT व्हेरियंटची किंमत 13.89 लाख रुपये आहे. Alpha AT व्हेरियंटची किंमत 14.89 लाख रुपये आहे. तर अल्फा MT आणि AT व्हेरियंटच्या ड्युअल टोन व्हर्जन्सची किंमत अनुक्रमे 13.85 लाख आणि 15.05 लाख रुपये आहे. या सर्व किंमती एक्स-शोरूम आहेत.
थारला देणार टक्कर?
ऑटो एक्स्पोमध्ये जेव्हा ही गाडी सादर करण्यात आली होती, तेव्हा याला पाहून लोकांना महिंद्राच्या थारची (Mahindra Thar) आठवण झाली. मारुतीची जिम्नी ही थारला चांगली टक्कर देईल असा कयास व्यक्त करण्यात येत होता. बरेच फीचर्स सारखे असल्यामुळे या कारची किंमत हा फॅक्टर इथं महत्त्वाचा ठरणार होता. मात्र, आता जिम्नीची किंमत थारपेक्षा जास्त असल्यामुळे, लोक थारला अधिक पसंती देतील असं मत व्यक्त करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.