Maruti Jimny : मारुती जिम्नीला जेव्हापासून ऑटो एक्सपो २०२३ मध्ये लाँच केली आहे तेव्हापासून चर्चेत आहे. काही दिवसांआधीच याची बुकिंग सुरू करण्यात आली. आतापर्यंत या गाडीची २३ हजारांहून जास्त बुकिंग मिळाली आहे. आणि विशेष म्हणजे याला आणखीन बुकिंग सुरूच आहेत.
शिवाय याची टोकन अमाउंट देखील फक्त २५ हजार रुपये आहे. मारुती जिम्नी एसयूव्ही मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात लाँच होऊ शकते अशी माहिती समोर आली आहे. परंतु, नेमकी तारीख काय हे अद्याप कळू शकलेले नाही.
मारुती जिम्नीचे दोन व्हेरियंट जीटा आणि अल्फा ऑप्शन असतील. यात १.५ लीटर, ४ सिलिंडर पेट्रोल इंजिन दिले जाईल. हे इंजिन १०३ बीएचपीचे पॉवर आणि १३४.२ न्यूटन मीटरचे टॉर्क जनरेट करते.
या एसयूव्ही मध्ये ५ स्पीड मॅन्युअल व ४ स्पीड टॉर्क कन्वर्टर ऑटोमॅटिक गियरबॉक्सचा ऑप्शन दिले आहे. यात सुझुकीची ऑलग्रिप प्रो ४ डब्ल्यूडी सिस्टम दिले आहे. याअंतर्गत २ डब्ल्यूडी आय सोबत लो रेंज गिअरबॉक्स, ४ डब्ल्यूडी आय व ४ डब्ल्यूडी लो मोड्स मिळते.
मारुती जिम्नीला ५ सिंगल टोन व २ ड्युअल टोन कलर ऑप्शन मिळतील. यात नेक्सा ब्लू, ब्लुईश ब्लॅक, सिजलिंग रेड, ग्रेनाइट ग्रे तसेच पर्ल आर्कटिक व्हाइट तसेच कायनेटिक यलो प्लस ब्लुईश ब्लॅक रुफ, सिजलिंग रेड प्लस ब्लुईश ब्लॅक कलरचा समावेश आहे.
या एसयूव्हीला लेडर फ्रेम चेसिस वर बनवली आहे. यात एकूण ५ लोक बसू शकतात. जिम्नीला नेक्सा डीलरशीप नेटवर्कवरून विकले जाणार आहे. याची अंदाजित किंमत १० ते १५ लाख रुपये दरम्यान असू शकते.
या एसयूव्ही मध्ये ऑटो हेडलाइट, मोठा ९ इंचाचा स्मार्टप्ले प्रो प्लस इंफोटेनमेंट यूनिट, अर्कामिस ऑडियो सिस्टम, अँड्रॉयड ऑटो व अॅपल कार कनेक्टिवीटी दिली आहे. जिम्नीमध्ये क्रूझ कंट्रोल, क्लायमेट कंट्रोल, कीलेस एन्ट्री, अलॉय व्हील्स, हेडलाइट वॉशर दिले आहे.
सुरक्षेसाठी जिम्नी एसूयव्हीमध्ये ६ एअरबॅग, हिल होल्ड कंट्रोल, हिल डिसेंट कंट्रोल व ब्रेक लिमिटेड स्लिप डिफरेंशियल दिले आहे. ही एसयूव्ही ३६ डीग्री अप्रोच अँगल, ५० डीग्री डिपार्चर अँगल, २४ डीग्री ब्रेक ओव्हर अँगल सोबत येते
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.