Tax on Cars: पैसा आला की सुख चैनीच्या वस्तू पण आल्या. आर्थिक दृढता आली की स्वतःची हि एक कार असावी अशी भावना मध्यमवर्गाय वर्गामध्ये नवीन नाही. पण जर तुम्ही कारचे गणित जाणून नाही घेतले तर आर्थिक नुकसानीची संभावना वाढते. प्रत्येक वस्तू आणि सेवेवर शासनाकडून डायरेक्ट किंवा इंडिरेक्ट टॅक्स आकारला जातो. आणि या महागाईत ४ ते ५ लाखांची कार घ्यायची असेल तर अनेकांना घाम फुटतो. पण ४ लाखाची कार घेतल्यावर तुम्हाला किती कर भरवा लागेल हे तुम्हाला ठाऊक आहे का?(Latest Marathi News)
उदाहरणार्थ, बहुतेक मध्यमवर्गाची पसंतीची कार म्हणजे मारुती सुझुकी अल्टो घेतली तर ग्राहकाला सुरवातीची किंमत हि ४ लाखांपेक्षाही कमी आहे. मारुती अल्टो हि लो मेन्टेनन्स (Low Maintenance) कार असल्यामुळे हि गाडी नेहमीच मध्यमवर्गाची पहिली पसंत असते.
मारुती अल्टोचे ‘कर’ गणित
अल्टो या मोटारकारचा बेस मॉडेल हा तुम्ही ३,९३,०५८ रुपयांत देखील विकत घेऊ शकता. दिल्लीतील एक्स-शोरूम मध्ये तर मारुती अल्टोची किंमत ३,५४,००० रुपयांपासून सुरू होते, तर टॉप मॉडेल ची किंमत ५ लाखांच्या वर आहे. म्हणजेच बेस मॉडेलची एक्स शोरूम ३,५४,००० तर ऑन रोड किंमत हि ३,९३,०,५८ रुपये इतकी आहे. चला तर जाणून घेऊया, जेव्हा तुम्ही मारुती अल्टो खरेदी करता तेव्हा कराच्या रूपात तुम्हाला किती पैसे मोजावे लागतात.(Latest Marathi News)
मुख्यतः ग्राहकांना GST आणि नोंदणी शुल्काच्या रूपात कराचे भरावा लागतो. या कारचे कर विभाजन तुम्ही जर समजून घेतले तर आपल्या लक्षात येईल की कारच्या किंमतीत एक मोठा हिस्सा हा कराच्या स्वरूपात समाविष्ट असतो. शासनाने वाहनांच्या आकार आणि सेगमेंटच्या हिशोबाने GST आणि Compensation Cess निर्धारित केला आहे. वाहन जितके आकाराने मोठे असेल तितका कर तुम्हाला भरावा लागेल. इतकच नव्हे तर लग्झरी कार्स वरती ५० टक्क्यांपर्यंत कर वसूला केला जातो.(Latest Marathi News)
एका अल्टो मागे शासनाच्या तिजोरीत जातात १ लाख
३,५४,००० रुपये किमतीच्या अल्टो (एक्स-शोरूम) मागे २८ टक्के GST (१४% GST + १४% SGST) आणि १ % Compensation Cess. यासगळ्यांची बेरीज केली तर २९% टॅक्स, असे कर विभाजन आहे.
या मोटारकारवर ३८,७१८.७५ रुपये GST वासूलला जातो. या रक्कमेला जर आपण जर ३,५४,००० रुपयांमधून वजा केले तर मारुती अल्टोची कररहित किंमत आपल्याला मिळेल जी २,७६,५६२. इतकी आहे. त्यातून आपण सेस म्हणजे २७५८ रुपये वजा केले तर या कारची किंमत २,७३,८०२ रुपये होते. याचाच अर्थ प्रत्येक अल्टो कार खरेदी मागे सरकारी तिजोरीत ७७४३७.५० अधिक २७५८ म्हणजे ८०१९५.५० रुपयांची भर पडते.(Latest Marathi News)
याशिवाय कार मालकाला RTO निर्धारित नोंदणी शुल्क भरावे लागते. दिल्लीमध्ये अल्टो कारच्या बेस मॉडेलसाठी हे शुल्क १४,९९० रुपये इतके आहे. कार विमा अनिवार्य असल्यामुळे विम्याचे वेगळे २०,६८३ रुपये द्यावे लागतात आणि ३३८५ इतके इतर शुल्क देखील जमा करावे लागतात.
कर, विमा आणि RTO शुल्काच्या रूपात ग्राहकाला मूळ किमतीच्या ४० टक्के अधिक पैसे खर्च करावे लागतात.
Maruti Suzuki Alto (On Road Price)
Ex-Showroom Price- 3,54,000 रुपये
RTO- 14,990 रुपये
Insurance - 20,683 रुपये
Other Tax (FasTag सहित)- 3,385 रुपये
-------------------------------------------
On-Road Price (Delhi)- 3,93,058 रुपये
सर्वप्रकाचे कर,विमा आणि RTO शुल्क वजा केले तर दिल्लीत अल्टो गाडीची किंमत फक्त २,७३,८०५ रुपये एवढी आहे. याचा अर्थ असा कि १ लाख १९ हजार रुपये यात आपण अधिक केली तर या गाडीची ऑन रोड किंमत वाढून ३,९३,०५८ इतकी होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.