मारुती सुझुकीने नवीन अल्टो (Maruti Suzuki Alto) हॅचबॅक मॉडेलवर काम सुरू केले असून हे अपडेटेड मॉडेल पुढील वर्षी लॉन्च केले जाऊ शकते. ही कंपनीची तिसरी कार असेल, ज्याला मारुती मोठे अपडेट देणार आहे. अल्टोच्या आधी कंपनी नेक्स्ट जनरेशन सेलेरियो आणि नंतर अपडेटेड बलेनो लॉन्च करेल. मारुती सुझुकीच्या या अल्टो मॉडेलचे काही फोटो नुकतेच लिक झाले आहेत. ज्यावरून या कारच्या डिझाईनचा अंदाजा येतो.
मारुतीची नवीन अल्टो
फोटोवरुन समोर आलेली माहिती अशी आहे की कंपनी या कारला SUV लुक देण्याऐवजी, तिचे हॅचबॅक डिझाइन कायम ठेवेल. पूर्ण-कव्हर केलेले टेस्ट-मॉडेल असल्यामुळे कारच्या अंतिम डिझाईनचा व्यवस्थित अंदाज येत नाही, परंतु ते काही स्टाइलिंग इलेमेंट या गाडीत मिळणे अपेक्षित आहे.
नवीन अल्टोला क्लॅमशेल बोनेटसह मोठे हेडलॅम्प, समोरील बंपरसाठी मोठे ग्रिल आणि फॉग लॅम्पसाठी वेगळी जागा मिळेल. साइड प्रोफाईलवर, सध्याच्या मॉडेलसारखेच ग्लास हाऊस आणि दरवाजाचे डिझाइन पुल-टाईप दाराच्या हँडल्ससह पाहायला मिळू शकते. या गाडीला 13-इंचाची स्टील व्हील्स मिळतील आणि समोरच्या फेंडरवरच टर्न इंडिकेटर दिले जातील, नवीन अल्टोमध्ये मोठे आणि अधिक चौकोनी टेल लॅम्प आणि थोडेसे सपाट टेलगेट डिझाइन मिळू शकते.
इंटीरियर आणि इंजिन
बाह्य रुपासोबतच या नवीन अल्टोला नवीन इंटीरियर डिझाइन देखील मिळेल अशी अपेक्षा आहे. मॅन्युअल एसी, सिंगल पीस फ्रंट सीट्स, पॉवर स्टीयरिंग आणि ड्युअल एअरबॅग्ज यांसारखी फीचर्स यात अपेक्षित आहेत. कारच्या टॉप व्हेरियंटमध्ये टचस्क्रीन देखील मिळू शकते. इंजिनबद्दल बोलायचे झाले तर त्यात पूर्वीप्रमाणे 796cc चे पेट्रोल इंजिन मिळू शकते. हे 3-सिलेंडर इंजिन 48PS पॉवर आणि 69Nm पीक टॉर्क जनरेट करते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.