मारुती बलेनोची क्रेझ! लॉच होताच 'या' बाबतीत बनली नंबर 1 कार

Maruti Suzuki baleno claims 22 94 kmpl mileage gets more than 25000 bookings in 16 days
Maruti Suzuki baleno claims 22 94 kmpl mileage gets more than 25000 bookings in 16 days
Updated on

भारतातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी Maruti Suzuki) ने सर्वाधिक विक्री होणाऱ्या हॅचबॅक बलेनो (Baleno) ची फेसलिफ्ट आवृत्ती लॉन्च केली आहे. ग्राहकांमध्ये या कारची क्रेझ इतकी आहे की, कंपनीला आतापर्यंत 25000 हजार बुकिंग मिळाले आहेत. याशिवाय या कारने लॉंच झाल्यानंतर अनेक वाहनांना मागे टाकले आहे. काय खास आहे या कारमध्ये, आज आपण या कारचे फीचर्स, इंजिन आणि किंमतीसह इतर माहिती जाणून घेऊयात..

बलेनो या बाबतीत सर्वांत पुढे

फ्युल इफिशियंसीच्या बाबतीत, ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (ARAI) च्या डेटानुसार, नवीन बलेनोचे मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक मॉडेल्ससाठी 22.34kmpl आणि 22.94kmpl मायलेज आहे. Hyundai i20 च्या मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक मॉडेल्सचे मायलेज 20.35kmpl आणि 19.65kmpl आहे. टाटा अल्ट्रोझच्या मॅन्युअल मॉडेलचे मायलेज 19.05 आहे. Volkswagen Polo TSI च्या मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक मॉडेल्सचे मायलेज 18.24kmpl आणि 16.47kmpl आहे. आणि Honda Jazz च्या मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक मॉडेल्सचे मायलेज 16.6kmpl आणि 17.1kmpl आहे. या आकडेवारीच्या आधारे, असे म्हणता येईल की नवीन बलेनो ही तिच्या प्रीमियम हॅचबॅक सेगमेंटमधील सर्वात जास्त फ्युल इफिशियंट कार बनली आहे आणि या कारने सर्वांना मागे टाकले आहे.

Maruti Suzuki baleno claims 22 94 kmpl mileage gets more than 25000 bookings in 16 days
Realme Narzo 50 भारतात लॉन्च, मिळेल 33W फास्ट चार्जिंग, 50MP कॅमेरा

इंजिन

2022 मारुती सुझुकी बलेनो फेसलिफ्ट मॉडेल हे मायलेज वाढवण्यासाठी स्टार्ट/स्टॉप तंत्रज्ञानासह नवीन 1.2-लीटर के-सीरीज ड्युअल जेट, ड्युअल VVT पेट्रोल इंजिनसह येते. हे सुमारे 88.5 एचपी पॉवर आणि 113 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. इंजिन 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि AMT (AGS) ला जोडलेले आहे. ही कार 22.94 kmpl पर्यंत मायलेज देण्याचा दावा कंपनी करते.

फीचर

नवीन 2022 मारुती सुझुकी बलेनो फेसलिफ्ट फीचर्सनी भरलेली आहे. यात Android Auto, Apple CarPlay आणि 40+ कनेक्टेड कार फीचरसह नवीन 9.0-इंचाची SmartPlay Pro+ टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम यात दिली आहे. इतर काही नवीन हाय-टेक फीचर्समध्ये हेड-अप डिस्प्ले, 360-डिग्री पार्किंग कॅमेरा, अलेक्सा कनेक्ट, एक ऑल-एलईडी लाइटिंग सिस्टम, फ्लॅट-बॉटम स्टीयरिंग व्हील, मागील एसी व्हेंट्स आणि सहा एअरबॅग्ज, ईएसपी, हिल होल्ड असिस्ट इत्यादींचा समावेश आहे. जसे की सेफ्टी इक्युपमेंट्सचा समाविष्ट आहे.

Maruti Suzuki baleno claims 22 94 kmpl mileage gets more than 25000 bookings in 16 days
इलेक्ट्रिक स्कूटर खरेदीचा विचार करताय? काय आहेत बेस्ट ऑप्शन, वाचा

किंमत किती आहे

मारुती सुझुकी चार ट्रिम लेव्हलमध्ये बलेनो ऑफर करत आहे. ते सिग्मा, डेल्टा, झेटा आणि अल्फा आहेत. 2022 मारुती सुझुकी बलेनोच्या फेसलिफ्टच्या किमती 6.35 लाख ते 9.49 लाख रुपये, एक्स-शोरूमच्या रेंजमध्ये आहेत. यासाठी बुकिंग आधीच सुरू झाली आहे आणि कोणीही 11,000 रुपये टोकन रक्कम भरून हा प्रीमियम हॅचबॅक बुक करू शकतो. तसेच या कारची स्पर्धा Hyundai i20, Honda Jazz, Tata Altroz या गाड्यांशी होणार आहे.

Maruti Suzuki baleno claims 22 94 kmpl mileage gets more than 25000 bookings in 16 days
परीक्षेनंतर मामाकडे आलेली नववीची मुलगी गरोदर; दोन वेळा अत्याचार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.