Maruti Suzuki Baleno बनली पूर्वीपेक्षा सुरक्षित, मारूतीने आणले अनेक नवीन सेफ्टी फीचर

मारुती कार त्यांच्या परवडणाऱ्या किमतींमुळे खूप लोकप्रिय
Maruti Suzuki Baleno
Maruti Suzuki Balenoesakal
Updated on

Maruti Suzuki Baleno : मारुती कार त्यांच्या परवडणाऱ्या किमतींमुळे खूप लोकप्रिय आहेत, परंतु त्यांच्या सुरक्षेबाबत अनेकदा प्रश्न निर्माण होतात. मात्र, आता कंपनी वाहनांच्या सुरक्षेसाठी काम करत आहे. नुकतेच त्यांनी आपल्या मारुती बलेनोला अपडेट केलं आहे. आता या कारमध्ये काही सेगमेंट फर्स्ट सेफ्टी फीचर्स जोडण्यात आले आहेत.

Maruti Suzuki Baleno
Amol Kolhe Health Update: अमोल कोल्हे यांच्या प्रकृतीसंदर्भात मोठी अपडेट; स्वतः पोस्ट करत दिली माहिती

मारुती बलेनो ही Nexa डीलरशिपद्वारे सर्वाधिक विक्री होणारी कार आहे. यापूर्वी ही स्विफ्ट, अल्टो आणि वॅगनआर सारख्या मारुतीची एंट्री लेव्हल कार होती. तथापि, आता टोयोटा-मारुतीच्या पार्टनरशिप मध्ये आलेली ही नवी एडिशन जबरदस्त अशीच आहे.

Maruti Suzuki Baleno
KTM Bike : KTM ला हलक्यात घेऊ नका, रॉयल एन्फिल्डला टक्कर देण्यासाठी आणलीय प्रीमियम बाईक

मारुती बलेनोमध्ये आणले आहे हे नवीन सेफ्टी फीचर

2023 बलेनोमध्ये मधल्या सीटच्या प्रवाशांसाठी 3-पॉइंट सीटबेल्ट मिळतात. या सीटसाठी अ‍ॅडजस्टेबल हेडरेस्ट देखील जोडण्यात आले आहे. कंपनीच्या मते, हे दोन्ही सेगमेंट-फर्स्ट फीचर्स आहेत. लवकरच ही वैशिष्ट्ये टोयोटा ग्लान्झा मध्ये देखील जोडली जातील. आगामी सुरक्षा नियमांमुळे कंपनीने हे बदल केल्याचे मानले जात आहे.

Maruti Suzuki Baleno
KTM Bike : KTM ला हलक्यात घेऊ नका, रॉयल एन्फिल्डला टक्कर देण्यासाठी आणलीय प्रीमियम बाईक

याशिवाय हिल होल्ड, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम, 360 डिग्री कॅमेरा, चार एअरबॅग्ज, हाय स्पीड अलर्ट, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, सीट बेल्ट रिमाइंडर, ब्रेक असिस्ट यासारखी सुरक्षा वैशिष्ट्ये मारुती बलेनोमध्ये आधीपासूनच आहेत.

Maruti Suzuki Baleno
Motorola Moto G : स्मार्टफोनचा बाप परत आला ! मोटोरोलाने लॉंच केले दोन नवीन स्मार्टफोन

मागील सीटच्या प्रवाशांसाठी सीट बेल्ट अनिवार्य आहे

मागील वर्षी, भारत सरकारने मागच्या सीटवर बसणाऱ्यांनाही सीट बेल्ट घालणे अनिवार्य केले आहे. मधल्या सीटवर बसणाऱ्यांसाठी ३-पॉइंट सीट बेल्ट लावणे बंधनकारक नसले तरी आगामी काळात त्याची अंमलबजावणी होणे अपेक्षित आहे. अशा परिस्थितीत मारुतीने यासाठी तयारी केली आहे. आगामी काळात मारुती नेक्साच्या इतर गाड्यांची सुरक्षा देखील अपडेट करेल अशी अपेक्षा आहे.

Maruti Suzuki Baleno
New SUV launch : यंदा बाजारात येणार 3 नव्या एसयूव्ही

मारुती बलेनो किंमत

चांगली गोष्ट म्हणजे सेफ्टी अपडेटनंतरही मारुती बलेनोची किंमत वाढलेली नाही. त्याची किंमत अजूनही रु. 6.61 लाखांपासून सुरू होते आणि रु. 9.88 लाख (एक्स-शोरूम) पर्यंत जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.