Maruti Celerio कारचे बुकिंग सुरु; देईल देशातील सर्वाधिक मायलेज

Maruti Suzuki Celerio
Maruti Suzuki CelerioGoogle
Updated on

देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकी इंडियाने (Maruti Suzuki India) दिवाळीच्या मुहूर्तावर आपल्या नवीन कार सेलेरियोचे (Maruti Celerio) प्री-बुकिंग सुरू केले आहे. ही देशातील सर्वाधिक फ्यूल एफिशियंट पेट्रोल कार असेल, असा कंपनीचा दावा आहे. आज आपण या कारचे फीचर्स आणि बुकिंग किंमत जाणून घ्या.

Maruti Celerio बुकिंग

कंपनीने मारुती सेलेरियोची बुकिंग फक्त 11,000 रुपयांना सुरू केली आहे. यावेळी कंपनीने ते एका नवीन पद्धतीने डिझाइन केले आहे, आत्तापर्यंत ही कार काही प्रसंगी स्पॉट केली गेली आहे आणि यावरून असे दिसून येते की, या कारमध्ये असलेले बरेच फीचर्स हे या सेगमेंटमध्ये कारमध्ये पहिल्यांदाच देण्यात आली असतील.

मारुती सेलेरियोचा लुक

मारुती सेलेरियोमध्ये बंपरला नवा लूक देण्यात आला आहे. त्याचबरोबर नवीन डॅशबोर्ड व्यतिरिक्त या कारच्या इंटीरियरमध्येही अनेक बदल करण्यात आले आहेत. ज्यात एक मोठी इन्फोटेनमेंट स्क्रीन दिली आहे जी Android Auto आणि Apple CarPlay कनेक्टिव्हिटीसह येते. मारुती सेलेरियोचे डिझाईन देखील अपडेट केले जाणार असून त्यात नवीन ग्रिल देण्यात येणार आहे. हेड लाइट डिझाइन देखील अपडेट केले जाईल. वाहनाचे एकूण प्रोफाइल आता पूर्वीपेक्षा अधिक गोलाकार करण्यात आले असून मारुती सुझुकी कारमध्ये नवीन फीचर्स, कंफर्ट आणि सेफ्टीची काळजी घेतली जाईल अशी अपेक्षा आहे.

Maruti Suzuki Celerio
नव्या रुपात येतेय Maruti Suzuki Alto; जाणून घ्या फीचर्स

देईल सर्वाधिक मायलेज

नवीन मारुती सेलेरियोमध्ये कंपनीने नेक्स्ट जनरेशन के-सीरीज ड्युअल जेट इंजिन दिले आहे. हे ड्युअल VVT इंजिन आहे जे कार उभी असताना इंजिन बंद करते. अशा प्रकारे ही इंधन बचत करणारी कार आहे. मारुती सुझुकी इंडियाचे मुख्य तांत्रिक अधिकारी सी.व्ही. रमण म्हणतात की, मारुती सेलेरियो ही भारतातील सर्वात फ्युल एफिशीयंट पेट्रोल कार असेल.

Maruti Celerioचे इंजिन

मारुती सेलेरियो कार 1.0 लिटर आणि 1.2 लिटर इंजिन दोन इंजिन पर्यायांसह येते. ही कार 5-स्पीड मॅन्युअल आणि 5-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे. मारुती सुझुकी सेलेरियोची बाजारात टाटा टियागो, डॅटसन गो आणि ह्युंदाई सँट्रोशी स्पर्धा होईल. सध्या मारुती सेलेरियोची किंमत 4.65 लाख ते 6 लाख रुपये यांच्या दरम्यान आहे.

Maruti Suzuki Celerio
Nokia चा पहिला टॅबलेट T20 भारतात लॉंच, पाहा किंमत आणि फीचर्स

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()