Maruti Suzuki Dzire : मारुती सुझुकीची नवीन डिझायर भारतात लाँच; परवडणाऱ्या किंमतीत, 5 स्टार सुरक्षा रेटिंगसह मिळणार हे उत्कृष्ट फीचर्स

Maruti Suzuki Dzire Car Prize Features : मारुती सुझुकी डिझायर नवीन कार लाँच झाली आहे.
Maruti Suzuki Dzire
Maruti Suzuki Dzire esakal
Updated on

Maruti Suzuki Dzire Car Launch : भारतातील सर्वाधिक विक्री होणारी कॉम्पॅक्ट सेडान कार मारुती सुझुकी डिझायर आता चौथ्या जनरेशनमध्ये नव्या लुक आणि फीचर्ससह बाजारात आली आहे. ही नवी डिझायर 5 स्टार GNCAP सुरक्षा रेटिंगसह सादर करण्यात आली असून, सेगमेंटमधील सर्वोत्तम मायलेजची हमी देते. ग्राहकांना दीर्घकाळ टिकणारी, किफायतशीर आणि सुरक्षित वाहन उपलब्ध करून देणाऱ्या मारुती डिझायरची आतापर्यंत 27 लाखांहून अधिक युनिट्स विक्री झाली आहे.

किंमत, वेरिएंट्स आणि मायलेज

नवीन डिझायरची भारतातील किंमत 6.79 लाख रुपयांपासून सुरू होते. LXI, VXI, ZXI, आणि ZXI+ असे वेरिएंट्स उपलब्ध आहेत. त्यातील VXI आणि ZXI वेरिएंटमध्ये कंपनी फॅक्टरी फिटेड CNG किटची सोयही देते. याशिवाय, ग्राहकांना सबस्क्रिप्शन मार्गाने नवीन डिझायरचे मासिक भाडे 18,248 रुपयांपासून सुरू होते.

नव्या डिझायरमध्ये 1.2 लिटर, 3-सिलिंडर इंजिन वापरले आहे, ज्यामुळे 82 एचपी पॉवर आणि 112 एनएम टॉर्क मिळतो. या इंजिनचे मायलेज मनुष्यचलित गिअरबॉक्ससह 24.79 kmpl, ऑटोमॅटिक (AMT) गिअरबॉक्ससह 25.71 kmpl, आणि CNG वेरिएंटमध्ये 33.73 km/kg पर्यंत आहे.

Maruti Suzuki Dzire
Sim Card Block : मोबाईल वापरकर्त्यांसाठी अलर्ट! ब्लॉक केले तब्बल 1 कोटी 17 लाख सिमकार्ड,नेमकं प्रकरण काय?

सुरक्षितता आणि आधुनिक फिचर्स

मारुती सुझुकीच्या नव्या डिझायरला 5 स्टार GNCAP सुरक्षा रेटिंग मिळाले आहे. कारमध्ये ABS, EBD, 6 एअरबॅग्स, हिल-होल्ड असिस्ट, ESP, ट्रॅक्शन कंट्रोल, रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स, मागील डिफॉगर, सीट बेल्ट रिमाइंडर्स यांसारखी अत्याधुनिक सुरक्षा साधने दिली आहेत. यासोबतच 9 इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टम, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्ले, कीलेस एंट्री, 360-डिग्री कॅमेरा आणि इलेक्ट्रिक सनरूफ यांसारखे नवीन फीचर्स देखील उपलब्ध आहेत.

Maruti Suzuki Dzire
Sunita Williams Health: सुनिता विल्यम्सना अंतराळात काय झालं? नासा देखील टेन्शनमध्ये, झपाट्याने कमी होतय वजन, फोटो पाहून तुम्हीही व्हाल शॉक

डिझाइन आणि रंगांचे पर्याय

नवीन डिझायरला युरोपियन लूक देण्यात आला आहे आणि सात रंग पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. गॅलंट रेड, नटमॅग ब्राऊन, अल्युरिंग ब्लू, ब्लुईश ब्लॅक, मॅग्मा ग्रे, आर्क्टिक व्हाइट आणि स्प्लेंडिड सिल्व्हर हे रंग उपलब्ध आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.