Invicto : मारूती-सुझुकीने लाँच केली नवी प्रीमियम MVP कार! जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

इनविक्टो कारमध्ये सात आणि आठ सीटर असे दोन्ही ऑप्शन पहायला मिळतात.
Suzuki Invicto
Suzuki InvictoeSakal
Updated on

मारुती सुझुकीने भारतात पहिल्यांदाच आपली सर्वात प्रीमियम आणि महाग एमव्हीपी कार लाँच केली आहे. सुझुकी इनविक्टो असं या गाडीचं नाव आहे. ही गाडी टोयोटा इनोव्हा हाय क्रॉस या गाडीचं रिबॅज्ड एडिशन आहे. यामध्ये नवीन डिझाईन, नवीन पॉवरट्रेन आणि कित्येक नवीन फीचर्स देण्यात आले आहेत.

मारुती सुझुकी इनविक्टोमध्ये २.० लीटर क्षमतेचं चार-सिलेंडर हायब्रिड पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे. याचं पॉवर आऊटपुट १८३ bhp आहे. इनोव्हा हायक्रॉसप्रमाणे यामध्ये नॅचुरली-एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन देण्यात आलेलं नाही.

Suzuki Invicto
Bajaj-Triumph : ४०० सीसी गाड्यांमध्ये वाढली स्पर्धा; आता ट्रायम्फच्या दोन दमदार बाईक्स लाँच! पाहा फीचर्स

फीचर्स

इनविक्टो कारमध्ये सात आणि आठ सीटर असे दोन्ही ऑप्शन पहायला मिळतात. यामध्ये व्हेंटिटाईज्ड फ्रंट सीट, ड्युअल झोन एसी, रिअर डोअर सनशेड असे कित्येक फीचर्स देण्यात आलेले आहे. यासोबतच, आयआर कट विंडशील्ड, पॉवर टेलगेट, ३६० व्ह्यू मॉनिटर, फ्लेक्सिबल सीटिंग, मल्टिपल स्टोअरेज, फोल्डिंग साईड टेबल, मल्टिपल चार्जिंग पोर्ट, पर्सनल रीडिंग लँप असे फीचर्सही यात दिले आहेत.

सेफ्टी फीचर्स

या कारमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी देखील कित्येक फीचर्स देण्यात आले आहेत. यामध्ये नेक्सा सेफ्टी शील्ड देण्यात आलंय. सोबतच फ्रंट, साईड आणि कर्टन बाजूला मिळून एकूण ६ एअर बॅग्स दिल्या आहेत. या कारमध्ये फ्रंट आणि रिअर डिस्क ब्रेक दिलं आहे. ऑटो होल्ड सोबत इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेकही यात दिले आहेत.

Suzuki Invicto
Flying Car : आता जमिनीवरून थेट हवेत न्या गाडी! जगातील पहिल्या उडणाऱ्या कारला मिळाली सरकारची परवानगी

किंमत

मारुती सुझुकी इनविक्टो तीन व्हेरियंटमध्ये लाँच करण्यात आली आहे. यातील Zeta+ हे ७ सीटर व्हेरियंट २४,७९,००० रुपयांपासून सुरू होतं. Zeta+ हे ८ सीटर व्हेरियंट २४,८४,००० रुपयांपासून सुरु होतं. तर, Alpha+ हे ७ सीटर व्हेरियंट २८,४२,००० रुपयांपासून सुरू होतं.

इनविक्टोची स्पर्धा बाजारात सध्या उपलब्ध असणाऱ्या महिंद्रा एक्सयूव्ही ७००, टोयोटो इनोव्हा हायक्रॉस आणि एमजी हेक्टर प्लस अशा गाडयांशी होणार आहे.

Suzuki Invicto
Car Tips : सिमेंटच्या रस्त्यावरील अपघात वाढले; गाडीचा टायर फुटू नये यासाठी कशी घ्याल खबरदारी? जाणून घ्या

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.