2021 हे वर्ष लवकरच संपणार आहे आणि वाहन निर्माता कंपन्या त्यांच्या वाहनांवर ईयर-एंड डिस्काउंटऑफर करत आहेत. मात्र, या कालावधीतील गेल्या काही वर्षांचा विचार करता हा डिस्काउंट फारसा नाही. मात्र देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकी देखील डिसेंबर महिन्यात आपल्या कारवर 48 हजार रुपयांची डिस्काउंट देत आहे. कंपनी एरिना रेंजच्या कारवर ही सूट देत आहे. जाणून घेऊया कोणत्या गाड्यांवर किती सूट मिळत आहे…
मारुती सुझुकी अल्टो
मारुती सुझुकी तिच्या एंट्री-लेव्हल हॅचबॅक अल्टोवर 20,000 रुपयांचा कॅश डिस्काउंट देत आहे. अल्टोच्या स्टँडर्ड ट्रिमवर हा कॅश डिस्काउंट मिळेल. तर इतर ट्रिम्सवर 30,000 रुपयांचा कॅश डिस्काउंट दिला जात आहे. यामध्ये 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 3,000 रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट देखील मिळेल. त्याच वेळी, अल्टोच्या CNG व्हर्जनवर फक्त कॉर्पोरेट डिस्काउंट दिला जाईल.
मारुती एस-प्रेसो आणि वॅगन-आर
कंपनी मारुतीच्या मायक्रो SUV M-Presso वर 15,000 रुपयांचा कॅश डिस्काउंट देत आहे. याशिवाय, कंपनी नोव्हेंबरमध्ये मारुतीच्या सर्वाधिक विकल्या जाणार्या कार वॅगन-आरवर 20 हजार रुपयांपर्यंत कॅश डिस्काउंट ऑफर करत आहे. दोन्ही गाड्यांना 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 3000 रुपयांची कॉर्पोरेट डिस्काउंट देखील मिळेल. दोन्ही कारच्या CNG व्हेरिएंटवर फक्त कॉर्पोरेट डिस्काउंट वैध असेल.
मारुती सेलेरियो आणि स्विफ्ट
अलीकडेच मारुतीने नवीन जनरेशन सेलेरियो लाँच केली आहे. विशेष बाब म्हणजे कंपनी न्यू जनरेशन कारवरही कॅश डिस्काउंट देत आहे. Celerio वर, कंपनी 5,000 चा कॅश डिस्काउंट, 10,000 चा एक्सचेंज बोनस देत आहे. स्विफ्टच्या Lxi आणि Vxi व्हेरिएंटवर 20,000 रुपयांचा कॅश डिस्काउंट आणि Zxi व Zxi+ व्हेरिएंवर 15,000 रुपयांचा कॅश डिस्काउंट दिला जात आहे. दुसरीकडे, स्विफ्टवर 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 3,000 रुपयांची कॉर्पोरेट डिस्काउंट देखील मिळेल.
स्विफ्ट डिझायर आणि विटारा ब्रेझा
Swift DZire वर 10,000 रुपयांचा डिस्काउंट, 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 2500 रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट देखील मिळेल.त्याच वेळी, Vitara Brezza वर 10,000 रुपयांचा डिस्काउंट मिळेल. याशिवाय, ब्रेझावर 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 3,000 रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट मिळेल.
अर्टिगा आणि मारुती इको
कंपनी डिसेंबर महिन्यात Ertiga वर कोणताही डिस्काउंट देत नाहीये. दुसरीकडे, Ertiga, सर्वाधिक विक्री होणारा 7-सीटर MPV सेगमेंटने अलीकडेच 7 लाख युनिट्सच्या विक्रीचा टप्पा गाठला आहे. Ertiga 16 एप्रिल 2012 रोजी लाँच झाली आहे. दरम्यान मारुतीच्या इको कारच्या पेट्रोल व्हेरियंटवर कंपनी 20 हजार रुपयांची कॅश डिस्काउंट, 10 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस देत आहे.Eeco च्या पेट्रोल आणि CNG व्हेरियंटवर 3,000 रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट देखील असेल.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.