Maruti Suzuki Swift CNG launched in India : मारुतीने आपल्या सर्वात लोकप्रिय हॅचबॅक कार स्विफ्टचे CNG मॉडेल लॉन्च केले आहे. कंपनीने याकारचे नाव स्विफ्ट एस-सीएनजी ठेवले असून तुम्ही ते Vxi आणि Zxi या दोन व्हेरिएंटमध्ये खरेदी करू शकाल. Swift S-CNG ची एक्स-शोरूम किंमत 7.77 लाख रुपये आहे. आता सर्वाधिक मायलेज देणाऱ्या कारच्या यादीत स्विफ्टचाही समावेश झाला असून मारुतीने या वर्षी वॅगनआर, सेलेरियो आणि डिझायरचे सीएनजी मॉडेलही लॉन्च केले आहेत. मारुती ही सीएनजी सेगमेंटमधील सर्वात मोठी कंपनी आहे.
स्विफ्ट S-CNG चे मायलेज
1.2L K-सिरीज ड्युअल जेट, ड्युअल VVT इंजिन देण्यात आले आहे, जे 77.49PS ची पॉवर आणि 98.5Nm टॉर्क जनरेट करते .इंजिन 5 स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले असून कंपनीच्या दाव्यानुसार, याचे मायलेज 30.90 किमी/किलो आहे. या मायलेजसह, स्विफ्ट एस-सीएनजी देशातील सर्वात जास्त इंधन कार्यक्षम प्रीमियम हॅचबॅक ठरणार आहे.
स्विफ्ट एस-सीएनजीचे फीचर्स
या कारच्या डिझाइनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तसेच, त्याच्या फीचर्समध्ये फारसे बदल करण्यात आलेले नाहीत. सुरक्षेसाठी यात अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टीम, ईबीडी, एअरबॅग्ज, रिव्हर्स पार्किंग सेन्सर, रिअर कॅमेरा, हिल होल्ड असिस्ट आणि इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल यांसारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. ही त्याच्या विभागातील सर्वात स्पोर्टी आणि सर्वात प्रशस्त कार आहे. कंपनीने आतापर्यंत 26 लाखांहून अधिक युनिट्सची विक्री केली आहे.
स्विफ्ट एस-सीएनजीचे व्हेरिएंट्स
मारुती स्विफ्ट एस-सीएनजी दोन प्रकारांमध्ये लॉन्च करण्यात आली आहे. त्याच्या Vxi व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 7.77 लाख रुपये आहे आणि Zxi व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 8.45 लाख रुपये आहे. त्याचे डायमेंशन्स 3845 मिमी, उंची 1530 मिमी, रुंदी 1735 मिमी आणि व्हीलबेसमध्ये 2450 मिमी आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.