येतेय मारुतीची पहिली इलेक्ट्रिक कार; काय असेल किंमत-फीचर्स?

Electric Car
Electric Car
Updated on

भारतात इलेक्ट्रिक वाहनांची (EV) मागणी सातत्याने वाढत आहे. केंद्र आणि राज्य सरकार इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक धोरणे बनवत आहेत आणि अनेक प्रकारची सबसिडीही देत ​​आहेत. अशा परिस्थितीत इलेक्ट्रिक वाहनांची मागणी आणखी वाढण्याची अपेक्षा आहे. विविध वाहन निर्माते त्यांची नवीन इलेक्ट्रिक वाहने भारतीय बाजारपेठेत लॉन्च करत आहेत. अशा परिस्थितीत जपानी कार निर्माता कंपनी सुझुकी मोटर कॉर्प (Suzuki Motor Corp) भारतीय इलेक्ट्रिक वाहन बाजारात प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. एका अहवालात दावा करण्यात आला आहे की मारुती सुझुकी त्यांच्या लोकप्रिय हॅचबॅक कार WagonR ची इलेक्ट्रिक आवृत्ती आणू शकते. 

मारुती सुझुकीने 2018 मध्ये ईव्ही आणण्याची घोषणा केली होती परंतु आतापर्यंत कंपनीने कोणतीही ईव्ही लॉन्च केलेली नाही. रिपोर्टनुसार, सुझुकी 2025 पर्यंत भारतात आपली पहिली इलेक्ट्रिक कार लॉन्च करू शकते. हे नवीन इलेक्ट्रिक वाहन प्रथम भारतात लॉन्च केले जाईल आणि नंतर सुझुकीच्या होम मार्केट जपान आणि युरोप सारख्या इतर बाजारपेठांमध्ये लॉन्च केले जाईल.

हॅचबॅकला स्टँडर्ड चार्जरद्वारे बॅटरी पूर्णपणे चार्ज करण्यासाठी 7 तास लागतील अशी अपेक्षा आहे. कंपनी यासोबत फास्ट-चार्जरचा पर्यायही देऊ शकते, ज्यामुळे कारची बॅटरी 0 ते 80 टक्के चार्ज होण्यासाठी एका तासापेक्षा कमी वेळ लागेल.रिपोर्टमध्ये दावा केला आहे की, WagonR EV एका पूर्ण बॅटरी चार्जवर 200 किमी पेक्षा जास्त अंतर कापू शकते.

Electric Car
'सोव्हिएत युनियन कोसळल्यानंतर मला टॅक्सी चालवावी लागली'- पुतिन

रिपोर्टनुसार कंपनी भारतीय ग्राहकांसाठी ऑल-इलेक्ट्रिक कॉम्पॅक्ट मॉडेल लॉन्च करण्याची योजना आखत आहे. रिपोर्टमध्ये जास्त माहिती देण्यात आली नसली तरी या इलेक्ट्रिक कारची किंमत 10 लाख ते 11 लाख रुपयांच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे. यात सुमारे $13,626 (रु. 10,19,872) किमतीच्या इलेक्ट्रिक वाहनांवरील सरकारी अनुदानाचाही समावेश असेल.

या रिपोर्टवर विश्वास ठेवला तर, मारुती सुझुकी इंडियाने इलेक्ट्रीक वाहन निर्मीती सुरु केल्यास ती इलेक्ट्रिक कार उद्योगासाठी मोठी गोष्ट असेल. ही कंपनी सध्या भारतातील सर्वात मोठी ऑटोमेकर आहे. भारतातील मारुती सुझुकीच्या विक्रीत अल्टो, वॅगनआर, बलेनो आणि स्विफ्ट सारख्या लहान, कॉम्पॅक्ट कारचे वर्चस्व आहे.

मारुती सुझुकी गेल्या काही काळापासून भारतीय रस्त्यावर WagonR सारख्या लोकप्रिय कारच्या काही इलेक्ट्रिक आवृत्त्यांची टेस्टींग करत आहे. मात्र त्याच्या लॉन्चच्या तारखेची कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र कंपनी सध्या इलेक्ट्रिक वाहनांपेक्षा CNG आधारित कार ऑफर करत आहे.

Electric Car
Honda Activa 125 प्रीमियम एडिशन भारतात लाँच; पाहा किंमत-फीचर्स

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.