मुंबई : शहरी टेकसॅव्ही कारशौकिनांसाठी नेक्सा एक्स एल ६ या आधुनिक वैशिष्ट्ये असलेल्या गाडीचे आज मारुती सुझुकीतर्फे येथे एका दिमाखदार समारंभात अनावरण करण्यात आले. मारुती सुझुकी इंडिया चे एमडी हिसाशी ताकिअुची, वरिष्ठ कार्यकारी संचालक शशांक श्रीवास्तव हे यावेळी उपस्थित होते.
किंमत किती असेल?
या कारमध्ये अनेक सेफ्टी फीचर्स तसेच अत्याधुनिक वैशिष्ट्ये असून ती प्रति लीटर पेट्रोलमागे अंदाजे २० ते २१ किमी धावते. तिच्या झीटा, अल्फा, अल्फा प्लस व अल्फा ड्यूएल टोन या वेगवेगळ्या मॉडेलची किंमत सव्वाअकरा लाखांपासून साडेचौदा लाखांपर्यंत आहे, असेही जाहीर करण्यात आले.
फीचर्स
ही सहा आसनी गाडी सहा रंगात उपलब्ध आहे. उतारावर गाडी मागे येऊ नये यासाठी व्यवस्था, चारही टायरमधल्या हवेचा दाब दाखविणारा स्क्रीन, पुढील दोनही सीटच्या कुशनमधून हवा खेळती राहण्याची व्यवस्था, त्या दोन सीटसाठी चार एअरबॅग, चालकाला गाडीच्या चारही बाजू दाखवणारे कॅमेरे, पार्किंगला मदत करणारी यंत्रणा, गाडीत शिरण्यापूर्वी रिमोटने एसी सुरु करणे, सूर्याच्या अतीनील किरणांची तीव्रता ८२ टक्के कमी करणाऱ्या काचा, ऑनबोर्ड व्हॉईस असिस्टन्स, कार्बनडायऑक्साईडचे ११.२ टक्के कमी उत्सर्जन ही या गाडीची वैशिष्ट्ये आहेत.
सेमिकंडक्टर चिप तसेच इलेक्ट्रॉनिक उपकरणांची टंचाई सध्या आहे, कच्च्या मालाच्या किमतीही वाढल्या आहेत. तरीही उत्पादनवाढ करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या मोटारीची किंमत जास्त असली तरी या प्रकारातील अन्य मोटारींमध्ये नसलेल्या सोयीही आम्ही दिल्या आहेत. पेट्रोल व डिझेल यांच्या किमतीतील फरक फारच कमी राहिल्याने आता डिझेलवर चालणाऱ्या गाड्या हा चांगला पर्याय राहिला नाही. या गाडीचे भविष्यात सीएनजी मॉडेल येईल का, हे आताच सांगता येणार नाही, असेही श्रीवास्तव म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.