नव्या अवतारात येतेय WagonR 2022, काय असेल किंमत फीचर्स? वाचा

maruti wagonr facelift 2022 may launch soon check price mileage here
maruti wagonr facelift 2022 may launch soon check price mileage here
Updated on

Maruti Suzuki WagonR 2022 लवकरच लॉन्च होणार आहे. पण त्याआधी त्याचा लेटेस्ट फोटो समोर आला आहे. मारुती सुझुकी आपल्या सध्या बाजारात असलेल्या रेंजच्या अपडेटेड व्हर्जन्ससह अनेक नवीन वाहनांवर काम करत आहे. कंपनी लवकरच 23 फेब्रुवारी 2022 रोजी देशात नवीन Baleno फेसलिफ्ट लॉन्च करेल.

याशिवाय कंपनी Ertiga, XL6 आणि WagonR च्या अपडेटेड व्हर्जन्सवरही काम करत आहे. यासह, कंपनी नवीन Vitara Brezza आणि सर्व नवीन मध्यम आकाराची SUV देखील तयार करत आहे, जी 2022 च्या अखेरीस लाँच केली जाईल. 2022 मारुती वॅगनआर फेसलिफ्ट देखील येत्या आठवड्यात लॉन्च होण्याची अपेक्षा आहे. या नवीन वॅगनआरच्या अपडेटेड मॉडेलच्या टीव्ही जाहिरात शूट दरम्यानचा एक फोटो समोर आला आहे.

समोर आलेल्या या फोटोनुसार 2022 मारुती वॅगनआर फेसलिफ्टच्या डिझाइनमध्ये फारसा बदल झालेला नाही. अपडेट केलेल्या मॉडेलवर फक्त ब्लॅक रुफ आणि नवीन ब्लॅक-आउट अलॉय व्हील दिसत आहेत. या टॉल बॉय हॅचबॅकमध्ये मारुती नवीन ऑप्शन्स देखील आणू शकते.

maruti wagonr facelift 2022 may launch soon check price mileage here
Maruti घेऊन येतेय पहिली इलेक्ट्रिक कार; किती असेल किंमत? वाचा

फीचर्स

2022 मारुती वॅगनआर फेसलिफ्टला नवीन सीट मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र, त्याच्या डॅशबोर्ड डिझाइनमध्ये बदल होण्याची शक्यता नाही. 2022 WagonR ला AMT व्हेरिएंट आणि इंजिन आयडल स्टार्ट स्टॉप सिस्टमसह हिल होल्ड सपोर्ट मिळू शकतो. Apple CarPlay आणि Android Auto सपोर्टसह 7-इंचाच्या टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टमसह हॅचबॅकची ऑफर केली जाईल.

इंजिन

नवीन वॅगनआरच्या इंजिनमध्ये कोणताही बदल दिसणार नाही. हे 2 पेट्रोल इंजिनसह येईल - 1.0-लिटर आणि 1.2-लिटर 4-सिलेंडर. 1.0 लीटर इंजिन 68bhp पॉवर आणि 90Nm टॉर्क जनरेट करते आणि 1.2L इंजिन 83bhp पॉवरसह येते. त्याच्या ट्रान्समिशन ऑप्शन्समध्ये 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सचा समावेश आहे.

maruti wagonr facelift 2022 may launch soon check price mileage here
'खुद की ही आबरू..'; संजय राऊतांच्या 'त्या' विधानावर चित्रा वाघ यांचा टोला

मायलेज, किंमत

सध्याचे 1.0 लिटर पेट्रोल इंजिन असलोला WagonR 22.5 kmpl मायलेज देते आणि 1.2 लिटर इंजिन क्षमता असलेली WagonR 21.5 kmpl मायलेज देते. त्याच वेळी, त्याचे CNG मायलेज 32.52 किमी आहे. सध्याच्या WagonR ची किंमत 5.73 लाख ते 6.19 लाख रुपये (एक्स-शोरूम) यादरम्यान आहे आहे.

maruti wagonr facelift 2022 may launch soon check price mileage here
Honda च्या 'या' 125cc स्कूटरला मिळतेय पसंती; झाली 2 लाखांहून जास्त खरेदी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.